

रक्षाबंधनाला शेतकऱ्यांना ₹4,000 मिळणार असल्याचा दावा
अतिरिक्त ₹2,000 देण्याची अधिकृत घोषणा आढळत नाही.
PM-KISAN अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना वर्षाला ₹6,000, तीन हप्त्यांत मिळतात.
आम्ही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो. शेतकऱ्यांना रक्षाबंधनाला 4 हजार रुपये मिळणार असल्याचा दावा करण्यात आलाय. पण, खरंच शेतकऱ्यांसाठी सरकारने वाढीव 2 हजारांची घोषणा केलीय का? खरंच या दाव्यात तथ्य आहे का? याची आम्ही पडताळणी केली.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय. त्यात असा दावा केला जात आहे की, पीएम किसान योजनेचा 24 वा हप्ता रक्षाबंधनाला येणार आहे. आणि शेतकऱ्यांच्या खात्यात 4 हजार जमा केले जातील पण, या दाव्यात तथ्य आहे का? शेतकऱ्यांना 4 महिन्यांनी 2 हजारांचा हप्ता मिळतो. मग आता रक्षा बंधनाला 4 हजार रुपये देणार आहेत का? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे.
हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होतोय. सरकार शेतकऱ्यांना 4 हजार रुपये देणार असल्याचा दावा केल्याने आनंदाचं वातावरण आहे...तर काहींना याबाबत संभ्रम आहे. खरंच सरकार शेतकऱ्यांना रक्षाबंधनाला 4 हजार रुपये देणार आहे का? हा विषय शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. कारण, पैसे देण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूकही होऊ शकते. त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमने याची सत्यता जाणून घेण्यासाठी पडताळणी केली. याबाबत अधिक माहिती सरकारकडूनच मिळवली.त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 जूनला पीएम-किसान योजनेचा 23 वा हप्ता आधीच जाहीर केला. केंद्र सरकारने 24 व्या हप्त्याबाबत अशी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे तुम्हाला असा कुणी व्हिडिओ पाठवला तर विश्वास ठेवू नका. आमच्या पडताळणीत रक्षाबंधनाला सरकार शेतकऱ्यांना 4 हजार रुपये देणार असल्याचा दावा असत्य ठरला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.