Fact Check : गटारीतील पाण्याची पाणीपुरी? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Fact Check viral video : आम्ही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो...आता पाणीपुरीत गटारीचं पाणी वापरल्याचा व्हिडिओ समोर आलाय...पण, खरंच पाणीपुरीवाल्याने गटारीच्या पाण्याचा वापर केलाय का...? या व्हिडिओची आम्ही याची पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं चला पाहुयात..
viral news
Fact Check viral video Saam tv
Published On

सध्या एक व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होतोय...पाणीपुरीवाला गटारातील पाणी हे पुरीच्या पाण्यात टाकत असल्याचं दिसतंय...हा पाणीपुरीवाला ग्राहकांच्या जीवाशी खेळत असल्याचं दिसतंय...या व्हिडिओवरून लोकांनी संताप व्यक्त केलाय...आणि हा पाणीपुरीवाला कुठला आहे याचा शोध घेण्याची मागणी केलीय...पण, खरंच हा पाणीपुरीवाला ग्राहकांच्या आरोग्याशी खेळतोय का...? याने गटारातील पाणी वापरलंय का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...

पाणीपुरीवाल्याकडून आरोग्याशी खेळ?

...हा विषय सगळ्यांच्या आरोग्याचा आहे...कारण, बरेच जण आवडीने पाणीपुरी खातात...आणि जर असे पाणीपुरीवाले अस्वच्छ पाणी वापरत असतील तर गंभीर आहे...त्यामुळे या व्हिडिओची सत्यता समोर आणणं गरजेचं आहे...आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली...याबाबत अधिक माहिती मिळवली...व्हिडिओ आम्ही नीट तपासून पाहिला...त्यावेळी या व्हिडिओत थोडी गडबड दिसली...

viral news
Maharashtra Live News Update: अहिल्यानगरमध्ये वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू, पाळीव कुत्राही दगावला

त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

व्हायरल सत्य

-साम इन्व्हिस्टिगेशन

पाणीपुरी विक्रेत्याचा व्हिडिओ हा खरा नाही

व्हायरल व्हिडिओ एआयच्या माध्यमातून बनवलाय

पाणीपुरी अनेकजण खात असल्याने व्हिडिओ व्हायरल

पाणीपुरी खवय्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

viral news
अहो काय सांगता! पेट्रोल पंपावर दारू मिळणार, काय आहे व्हायरल सत्य?

सध्या एआयच्या माध्यमातून बरेचजण व्हिडिओ तयार करतात...प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये AI मध्ये कोणताही व्हिडिओ बनवू शकतो...असेच व्हिडिओ बनवून व्हायरल केले जातात...आणि काहींना हे व्हिडिओ खरे वाटतात...मग ते पुढे पाठवतात...यामुळे दिशाभूल होते...त्यामुळे आमच्या पडताळणीत पाणीपुरीच्या पाण्यात गटारीचं पाणी वापरल्याचा दावा असत्य ठरलाय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com