अहो काय सांगता! पेट्रोल पंपावर दारू मिळणार, काय आहे व्हायरल सत्य?

Fact Check Liquor Sale On Petrol Pumps : आम्ही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो. आता एक व्हिडिओ व्हायरल होतोय..त्यात दावा करण्यात आलाय की आता पेट्रोल पंपांवरही दारू मिळणार आहे.पण, खरंच सरकारने असा निर्णय घेतलाय का? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.
Fact Check Liquor Sale On Petrol Pumps :
A viral video claims liquor will be sold at petrol pumps.saam tv
Published On
Summary
  • पेट्रोल पंपांवर दारू विक्रीचा व्हायरल दावा

  • सरकारकडून असा कोणताही अधिकृत निर्णय नाही

  • व्हिडिओ दिशाभूल करणारा असल्याची शक्यता

आता पेट्रोल पंपावरही दारू मिळणार आहे होय, असाच या व्हिडिओत दावा करण्यात आलाय. पण, खरंच पेट्रोल पंपांवरही दारू मिळणार आहे का? सरकारने असा निर्णय घेतलाय का? हा दावा खरा असेल तर पेट्रोल पंपावर दारू विकण्याचा निर्णय सरकारने का घेतला असेल? याबाबत माहिती मिळवण्याचा आम्ही प्रयत्न केला.

दारू ही आरोग्यास चांगली नाही, त्याचं आम्ही समर्थन करत नाही पण, हा व्हिडिओ आता व्हायरल झाल्यामुळे नक्की हा सरकारने निर्णय घेतलाय का? पेट्रोल पंपासोबतच शॉपिंग मॉल्स आणि स्थानिक बाजारपेठांमध्येही दारू विकण्यास मंजुरी दिल्याचा दावा केलाय.त्यामुळं आम्ही या व्हिडिओची पडताळणी सुरू केली. महाराष्ट्र सरकारने हा निर्णय़ घेतलाय का? याबाबत माहिती मिळवली. तसेच काही मॅकझिन्स, पेपरमधील बातम्या पाहिल्या.त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.

व्हायरल सत्य काय? साम इन्व्हिस्टिगेशनमधून काय समोर आलं?

पेट्रोल पंपावर दारूविक्रीचा निर्णय महाराष्ट्र सरकारचा नाही

चंदीगड प्रशासनाचा पेट्रोल पंपावर दारूविक्रीचा निर्णय

नवीन उत्पादन शुल्क धोरण 2026-27 ला मंजुरी दिली

पेट्रोल पंप, शॉपिंग मॉल्स, स्थानिक बाजारपेठेत दारू मिळणार

स्टोअर्सदेखील विदेशी दारू, वाईन, बिअर विकू शकतील.

हा निर्णय केंद्र सरकार किंवा महाराष्ट्र सरकारचा नाहीये. महाराष्ट्रातील सरकारने दारू विक्रीचा नियम बदललेले नाहीत. चंदीगड प्रशासनाने नवीन धोरणात एक मोठा बदल केलाय.पारदर्शकता आणि उत्तम नियंत्रण, उत्पादन शुल्क वाढीसाठी हा निर्णय घेतलाय. यावेळी त्यांनी जबाबदारीने दारू विक्रीसाठी नियम घातलेयत. बार, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये अल्कोहोल मीटर बसवणे देखील अनिवार्य केलेयत. हा निर्णय महाराष्ट्रासाठी नाही पण, चंदीगड प्रशासनाने घेतलाय. त्यामुळे आमच्या पेट्रोल पंपावर दारू मिळणार हा दावा सत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com