

देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांमधून सरकार आता सोनं जप्त करण्यासाठी नवीन योजना सुरू करतंय असा दावा करण्यात आलाय...सरकार मंदिरांचा कळस, घुमट, दरवाजे आणि इतर वास्तूंवरील सोन्याचा मुलामा हा आता स्ट्रॅटेजिक गोल्ड रिझर्व्ह ऑफ इंडिया म्हणून घोषित करेल...असा दावा केलाय...पण, खरंच सरकार मंदिरांमधील सोनं जप्त करणार आहे का...? असा सवाल उपस्थित होतोय...पण, खरंच अशी सरकारची योजना आहे का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...
व्हायरल मेसेजमध्ये म्हटलं आहे की, सरकार मंदिरांच्या सोन्यासाठी नवी गोल्ड मोनेटाइजेशन स्कीम आणणार आहे. मंदिरांकडील सोन्याच्या बदल्यात त्यांना गोल्ड बाँड दिले जातील'.
मंदिरांना त्यांच्या सोन्याच्या बदल्यात गोल्ड बॉण्ड्स जारी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याचा दावा केलाय...या व्हायरल मेसेजमुळे देशभरातील भाविकांमध्ये आणि मंदिर प्रशासनामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालंय...सोशल मीडियावर लोकांनी याला 'धार्मिक संपत्तीवर घाला म्हणत सरकारवर टीका करायला सुरुवात केली...त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केलीय...खरंच सरकार अशी योजना आणण्याचा विचार करतंय का...? सरकार मंदिरातील सोनं का ताब्यात घेणाराय...? आर्थिक संकटामुळे सरकारचा हा प्लान आहे का...? याची आम्ही माहिती मिळवली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...
व्हायरल सत्य काय?
मंदिरांचे सोने जप्त करण्याच्या बातमीत तथ्य नाही
सोनं ताब्यात घेण्याची सरकारची कोणतीही योजना नाही
व्हायरल होत असलेला मेसेज दिशाभूल करणारा
मंदिर, धार्मिक संस्थांचं सोनं सरकार जप्त करणार नाही
गोल्ड मोनेटाइजेशन योजना आणण्याचा विचार नाही
मंदिरांचे कळस, दरवाजांवर असलेल्या सोन्याला 'स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह' घोषित करण्याचा दावा पूर्णपणे खोटा आहे...नागरिकांनी अशा कोणत्याही व्हायरल माहितीवर विश्वास ठेवू नये आणि ती पुढे शेअर करू नये...सध्या देशावर आर्थिक संकट आलंय...त्यामुळे अशा चर्चांना उधाण येतं...मात्र, आता सरकार मंदिरातील सोनं जप्त करणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.