Fact Check : कोरोनाच्या लसीमुळे हार्ट अटॅकचा धोका? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? VIDEO

Fact Check about corona vaccine : कोरोना लसीमुळे हार्ट अटॅकचा धोका होतो, असा दावा एका मेसेजमध्ये करण्यात आला आहे. हा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल मेसेजमागील सत्य जाणून घेऊयात.
corona
There is no risk of heart attack due to corona vaccine, ICMR refuted the claimSaam TV
Published On

तुम्ही कोरोनाची लस घेतली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे...कारण, आता कोरोना लसीमुळे हार्ट अटॅक येऊ शकतो असा दावा करण्यात आलाय...खरंच कोरोना लसीमुळे आरोग्यावर परिणाम होतायत का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

या व्हिडिओत दावा करण्यात आलाय कोरोना झालेल्यांना आणि कोरोनाची लस घेतलेल्यांमध्ये हार्ट अटॅकचा धोका वाढलाय...खरंच हा दावा खरा आहे का...? कोरोना लसीचे इफेक्ट आता होऊ लागलेयत का...? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे.

corona
Cancer vaccine: रशियाची लस नेमक्या कोणत्या कॅन्सरवर करणार उपचार? पाहा तज्ज्ञांनी काय सांगितलं?

आता ही तरुणी बघा, डान्स करत असतानाच ही तरुणी खाली कोसळली आणि डोळ्यादेखत तिचा मृत्यू झाला...हार्ट अटॅक आल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आलाय...जगभरात कोरोनाचं संकट ओढावलं होतं...त्यावेळी याच लसीसाठी लोक रांगा लावत होते...मात्र, आता कोरोना काळात घेतलेल्या लसीचे गंभीर परिणाम जाणवत असल्याचा दावा केल्यानं लोकांच्या मनात भीती निर्माण झालीय...खरंच या दाव्यात तथ्य आहे का...? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...याबाबत अधिक माहिती डॉक्टर देऊ शकतात...त्यामुळे आमचे प्रतिनिधी डॉक्टरांना भेटले...त्यांना व्हायरल मेसेज दाखवून यामागचं सत्य जाणून घेतलं.

corona
Cancer vaccine: भारतासह १४० हून अधिक देशांमध्ये दिली जाते कॅन्सर प्रतिबंध लस? पाहा कोणत्या कॅन्सरवर ठरते प्रभावी

त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

साम इन्व्हिस्टिगेशन

⁠कोरोना लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या होण्याचं प्रमाण वाढलं

कोरोना झालेल्यांनाही अनेक प्रकारचा त्रास जाणवतोय

विशेष म्हणजे याची कोणतीही पूर्वकल्पना रुग्णाला मिळत नाही

अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका येण्याच्या घटना वाढल्या

corona
Cancer Vaccine : कोरोनानंतर कॅन्सरचीही लस भारतात फ्री मिळणार का?

चालताना श्वास घेण्यास त्रास होत असल्यास तत्काळ तपासणी करावी

अतिप्रमाणात एक्सरसाईज करू नका

तुम्ही कोरोनाची लस घेतली असेल आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या...आमच्या पडताळणीत कोरोना लसीमुळे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढल्याचा दावा सत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com