Priya More
हार्ट अटॅक ही एक गंभीर आरोग्य समस्या आहे. ज्यामध्ये योग्य वेळी योग्य पावलं उचलणे खूप महत्वाचे आहे.
अनेकदा लोकं घाबरून हार्ट अटॅकच्या रुग्णाला पाणी देण्याचा प्रयत्न करतात. पण तसं करणं योग्य नाही.
हार्ट अटॅक आल्यानंतर रुग्णांना पाणी देऊ नये असा सल्ला डॉक्टर देतात. त्यामागे मोठं कारण आहे.
हार्ट अटॅकच्या वेळी हृदय आधीच खूप कमकुवत असते. जर रुग्णाला पाणी दिले तर ते पोटात जाऊ जाऊन हृदयावर जास्त दबाव येऊ शकतो.
हृदयविकाराच्या झटक्यात अनेक वेळा रुग्ण बेशुद्ध होऊ शकतो.
रुग्ण बेशुद्ध झाल्यानंतर त्याला पाणी दिले तर ते पाणी चुकीच्या नळीमध्ये जाऊ शकते. ज्यामुळे गुदमरण्याचा धोका वाढू शकतो.
काही रुग्णांना हृदयविकाराच्या झटक्याने उलट्या होऊ शकतात.
हार्ट अटॅक आल्यानंतर जर पाणी दिले तर उलट्या होण्याचा धोका वाढू शकतो आणि रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.