Priya More
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले आहेत.
कुंभमेळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी कुणी ट्रेनने तर कुणी वाहनांनी प्रवास करत आहेत. त्यामुळे प्रयागराजमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.
प्रयागराजमधील वाहतूक कोंडी सोडवणे सध्या पोलिस आणि वाहतूक यंत्रणेच्या डोकेदुखीचं कारण ठरताना दिसत आहे.
भाविकांची प्रचंड गर्दी पाहता प्रशासनाने संगम रेल्वे स्टेशन १४ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
प्रयागराजच्या सर्व प्रमुख मार्गांवर १० ते २५ किमीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
वाहतूक कोंडीमुळे भाविकांना तासनतास गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. एकाच ठिकाणी भाविक अडकले आहेत.
ना पाणी ना अन्न एकाच ठिकाणी गेल्या १२ ते १५ तासांपासून भाविक अडकले आहेत. त्यामुळे भाविकांचे हाल होत आहे.
वाराणसी, लखनऊ, कानपूर, रायबरेली, जौनपूर आणि कौशांबी येथून प्रयागराजला येणारे सर्व महामार्ग पूर्णपणे ठप्प झाले आहेत.
गर्दी नियंत्रित करण्यासाठी १५ फेब्रुवारीनंतर भाविकांना येण्याचे आवाहन पोलिस आणि प्रशासनाने केले आहे. भाविकांना परत जाण्याचे आवाहन केले जात आहे.