
कॅन्सरचं नाव ऐकलं की आपल्याला धडकीच भरते. यामुळे अनेक कुटुंबे अडचणीत आली आहेत. कॅन्सर हा एक जीवघेणा आजार आहे, जो जगभरातील मृत्यूचे प्रमुख कारण आहे. याच कॅन्सरवर मात केल्याचा दावा रशियाने केलाय. रशियाने कर्करोगावरील लस विकसित करत महत्त्वपूर्ण संशोधन केलेय. आत्तापर्यंत कॅन्सरवर प्रभावी असणारी कोणतीही विशिष्ट लस जगात पूर्णपणे मान्यताप्राप्त नाही. पण रशियाला कॅन्सरच्या लसीच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये यश मिळाले आहे.
२०२५ पासून रशियामध्ये ही लस उपलब्ध होणार आहे. रशियात ही लस आल्यानंतर आता कोरोनासारखेच भारतात मोफत कॅन्सरची लस मिळणार का? अशी चर्चा सुरू झाली.
२०१९ मध्ये कोरोना महामारीने जगात हाहाकार माजवला होता. लाखो लोकांच्या मृत्यूचं कारण ठरलेल्या कोरोना विषाणूवर भारतामध्ये लस तयार करण्यात आली. कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशी भारताने तयार करत जागतिक स्तरावर महत्त्वपूर्ण योगदान दिले. भारताने अनेक देशांना मोफत कोरोना लस दिली.
"वॅक्सिन मैत्री" उपक्रम राबत भारताने ९० पेक्षा जास्त देशांना कोविड लसींचा पुरवठा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतामध्ये मोफत कोरोना लस दिली होती. त्यामुळे आत कॅन्सरची लसही भारतात मोफत दिली जाईल का? अशी चर्चा होऊ लागली आहे.
चीन आणि अमेरिकानंतर भारतामध्ये सर्वाधिक कॅन्सरग्रस्त रूग्ण आहेत. दररोज शेकडो लोकांचा कॅन्सरमुळे मृत्यू होतो, असा दावा अनेक अहवालांमधून केला जातोय. त्यामुळे या जीवघेण्या कॅन्सरवर गेल्या अनेक वर्षांपासून लस शोधली जातेय. पण आता अखेर रशियाला यश मिळालेय. रशिया कोरोना लस शोधण्यात अखेरच्या टप्प्यात आहे. क्लिनिकल ट्रायलमध्ये त्यांना यश मिळालेय, २०२५ पासून ही लस बाजारात येईल.
त्यामुळे भारत आण रशियाचे संबंध पाहाता भारताला कॅन्सर लस लवकर मिळेल, असे म्हटले जातेय. कोरोना महामारीच्या काळात भारताने महत्त्वाची भूमिका बजावत जगभरात लसीचा पुरवठा केला होता. आता भारताला कॅन्सरची लस मिळेल, असे म्हटले जातेय.
गेल्या अनेक दशकांपासून भारत-रशिया यांचे घनिष्ठ संबंध आहेत. राजकीय, संरक्षण, व्यापार, विज्ञान, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक सहकार्य यासह भारत आणि रशियाचे मैत्रिपूर्ण संबंध आहेत. शीतयुद्धाच्या काळापासून सुरुवात झाले आणि आजही दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील बदलत्या राजकीय परिस्थितीत भारत आणि रशियाचे संबंध आणखी दृढ होतील.
त्याशिवाय भारताने रशियाला थेट कोरोना लस पुरवलेली नाही. परंतु, भारत आणि रशिया यांनी कोविड-19 लसीकरणाच्या क्षेत्रात सहकार्य केले आहे. त्यामुळे रशियासोबतचे संबंध पाहता भारताला कॅन्सरची लस लवकर मिळू शकते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आलेत. मागील दहा वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. कोरोना काळात सर्वांनाच मोफत धान्य पुरवठा केला. त्याशिवाय कोरोनाची मोफत लस दिली होती. भारतामधील कोट्यवधी नागरिकांना मोफत लस देत मोदींनी जगाच्या पातळीवर सर्वांनाच धक्का दिला. भारतामध्ये पंतप्रधान मोदींनी गावागावात लस उपलब्ध करून देण्याची मोहीम राबवली होती. आता रशियाकडून कोरोनाची लस मिळाली तर मोदी सरकार भारतामध्ये ती लस मोफत देणार का? अशी जोरदार चर्चा सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.