Black Rain : 'काळा पाऊस' कोसळला; नागरिक हबकले, मॉस्कोमधील व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Black Rain Moscow Video Viral: मॉस्कोमधील काही भागांत काळा पाऊस पडल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण खरंच काळा पाऊस कोसळला का? व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमागचं सत्य काय जाणून घ्या.
काळा पाऊस कोसळला, व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? जाणून घ्या
मॉस्कोच्या रस्त्यांवर काळा पाऊस पडल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. काय आहे यामागचं सत्य?Social Media
Published On

moscow black rain claims explained after oil refinery attack : युक्रेनने रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला केला. या हल्ल्याच्या काही वेळानंतरच मॉस्कोमधील काही भागांत जणू 'काळा पाऊस' पडायला लागला. हलक्या पावसानंतर रस्ते, वाहनांवर तेलासारखा चिकट द्रवपदार्थ पसरला होता. आकाशातही काळे ढग जमा झाल्याचे दिसले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. मॉस्कोमध्ये काळा पाऊस पडल्याचा दावा नेटकरी करत आहेत. तशा प्रतिक्रियाही व्हायरल व्हिडिओच्या पोस्टमध्ये दिल्या जात आहेत.

मॉस्कोमधील एक मोठ्या तेल रिफायनरीवर युक्रेनने जोरदार ड्रोन हल्ले केले. या हल्ल्यानंतर गुरुवारी रशियाची राजधानी असलेल्या मॉस्कोमधील काही भागांतील रस्ते आणि वाहनांवर काळ्या रंगाचे, तेलकट, चिकट द्रवपदार्थ पसरले होते. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, या हल्ल्यानंतर विचित्र घटना घडली. निवासी परिसरात काळ्या तेलाचे कण पावसासारखे आकाशातून कोसळू लागले. युक्रेनने मॉस्कोवर केलेल्या सर्वात मोठ्या हल्ल्यानंतर ही विचित्र घटना घडली. युक्रेनने जवळपास २०० ड्रोन डागले होते. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, या हल्ल्यामुळे आकाशात काळ्या धुराचे लोट पसरले. त्यानंतर पाऊसही पडला. हा पाऊस काळ्या रंगासारखा होता. रस्ते, वाहनांवर तेलकट, चिकट काळ्या रंगाचा द्रवपदार्थ पसरला होता.

युक्रेनने केलेल्या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर बरेच व्हिडिओ व्हायरल होऊ लागले. त्यात कार, बिल्डिंगच्या खिडक्या आणि रस्त्यांवर चिकट, काळ्या रंगाचा चिकट द्रवपदार्थ जमा झाल्याचे दिसून येत होते. हा नेमका काय प्रकार आहे, याची खात्रीही काही लोकांनी केल्याचेही व्हिडिओत दिसते.

सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होणाऱ्या व्हिडिओनंतर, स्थानिक प्रशासनाने काळा पाऊस नाहीच, असे सांगण्याचा प्रयत्न केला. शहरात काळा पाऊस किंवा तेलाचा पाऊस पडलाच नाही, असे स्पष्टपणे सांगितले. तर स्थानिक चॅनेल्सवर अशा काळात आरोग्यविषयक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत होते.

तर, तेथील प्रशासनाने खबरदारी म्हणून नागरिकांसाठी खबरदारीच्या सूचनाही दिल्या. विषारी गॅसचा आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून नागरिकांनी घरांच्या खिडक्या बंद करून घेण्याचा सल्ला दिला. लहान मुले घरात असतील तर त्या कुटुंबांनी, वयोवृद्ध नागरिक आणि दम्याचा त्रास किंवा श्वसनाचे विकार असणाऱ्या नागरिकांनी संबंधित परिसरातून त्वरित सुरक्षित ठिकाणी जावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले होते.

मॉस्कोतील स्थानिकांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, शहरात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला. कपड्यांवर काळ्या रंगाचे डाग पडले. तेलासारखा चिकट द्रवपदार्थ रस्ते आणि वाहनांवर पडला होता, असेही काहींनी सांगितले. दरम्यान, २४ तासांत देशभरात जवळपास हजार ड्रोन आणि मिसाइल रोखण्यात आल्याचा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे.

काळा पाऊस कोसळला, व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? जाणून घ्या
Police Viral Video: "तू कोण मला विचारणारा?" सीटबेल्ट लावण्याच्या मुद्द्यावरून पोलिसाचा संताप कॅमेरात कैद, व्हिडीओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com