Desi Jugaad Video: कपडे इस्त्री करण्यासाठी महिलेचा अनोखा जुगाड, क्षणांत होईल काम; पहा VIDEO

Viral Video News: इंटरनेटवर जुगाडचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. पण, हा लेटेस्ट व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरणार नाही. एका महिलेने कुकरचा वापर करून तिच्या शर्टला ईस्त्री केली आहे.
Desi Jugaad Video
Desi Jugaad VideoSaam Tv
Published On

Woman Use Pressure Cooker As Iron

ऑफिसला जाताना अचानक लाईट गेली. अन् तुमचा शर्ट किंवा कपडे इस्त्री करायचे राहिले आहेत. अशी स्थितीत तुम्ही काय कराल? मग तुम्ही काय कराल. भारतीयांचा जुगाड करण्याच्या बाबतीत हात कोणीच धरू शकत (Desi Jugaad Video) नाही. प्रॉब्लेम कितीही मोठा असला तरी त्यावर कोणतं न कोणतं जुगाड असतंच. असंच एक अनोखं जुगाड समोर आलं आहे. (Latest Viral Video)

कपड्यांना इस्त्री करण्यासाठी आपल्याला नेहमीच विजेची गरज पडते. पण आता लाईट नसेल तरीही कपड्यांना इस्त्री करता येणार आहे. एका महिलेने कपडे इस्त्री करण्यासाठी आगळीवेगळी युक्ती वापरली आहे. त्यामुळे तिचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला (Iron) आहे. या व्हायरल व्हिडिओ क्लिपमध्ये दिसतंय की, कुकर इंडक्शनवर ठेवला आहे. त्याच्याजवळ एक महिला उभी आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कुकरची शिट्टी वाजताच ती महिला इंडक्शनवरून कुकर उचलते आणि पळून जाते. ती बेडरूममध्ये पोहोचते आणि कुकरच्या मदतीने शर्ट इस्त्री करू लागते. महिलेची हा जुगाड इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत (Viral Video) आहे. हा व्हिडीओ @Babymishra_ या X अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

व्हिडिओमध्ये दिसतंय की, सर्वात आधी महिलेनं एका प्रेशर कूकरमध्ये पाणी गरम केलं होतं. कूकरची शिट्टी वाजताच तिनं गॅस बंद केला. तो कूकर तिने इस्त्रीप्रमाणे शर्टावर (viral news) फिरला. मग काय, चुरगळलेल्या शर्टाला काही क्षणांत मस्तपैकी इस्त्री झाली. हा व्हिडीओ आतापर्यंत २ लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. अनेकांनी या देसी जुगाडचं कौतुक केलंय.

Desi Jugaad Video
Viral Video: टोईंग व्हॅनच्या कर्मचाऱ्यांची गुंडगिरी; पोलिसांसमोरच तरूणाला शिवागाळ करत बेदम मारहाण, नागपुरातील Video समोर

अनेकांनी या महिलेच्या हुशारीला सलाम केलं (Woman Use Pressure Cooker As Iron) आहे. आता वाफेवर चालणारी इस्त्री मार्केटमध्ये आली आहे. त्यामुळे आता विजेची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. तुम्हाला ही इस्त्री पाहून काय वाटतंय?

या व्हिडिओला सोशल मीडियावर चांगली पसंती मिळत आहे.

Desi Jugaad Video
Viral Video : शेवटी बाप तो बापच असतो; पोटाची खळगी भरण्यासाठी रेल्वेत दरवाजाजवळ बसून केलं जेवण, हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com