आपल्या मुलांना काही होऊनये त्यांना हवं नको ते सर्व काही बघावं यासाठी आई कायम घरात आणि मुलांच्या अवतीभोवती असते. मात्र आई हे सर्व काही बाबांमुळे करू शकते. बाबा रोज घराबाहेर पडून पैसे कमवून आणतात त्यामुळे मुलांना हव्या नको त्या सर्व गोष्टी पुरवता येतात. सध्या सोशल मीडियावर वडिलांचं प्रेम आणि त्यांची धडपड दाखवणारा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती मुंबईच्या लोकल ट्रेनमधील प्रवास करत आहे. प्रवास आणि कामाच्या व्यापात या व्यक्तीला दोन घास खाण्यासाठी देखील वेळ नाही. मात्र भूक काही स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे या व्यक्तीने थेट रेल्वेच्या डब्यातच खाली बसून आपलं जेवण केलं आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आलाय.
मुंबई लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना अनेकदा बसण्यासाठी सीट मिळत नाही. सीट नसल्याने बराच वेळ उभं रहावं लागतं. काहीवेळा तर 1 ते 2 तास देखील उभे राहून प्रवास करावा लागतो. आता या व्यक्तीला देखील ट्रेनमध्ये बसण्यासाठी सीट मिळालं नाही. उभे राहून राहून पाय दुखू लागले. त्यामुळे त्यांनी थेट दरवाजा जवळ असलेल्या जागेत मांडी घालून बसण्याचा निर्णय घतेला.
तिथेच बसून त्यांनी घरून दिलेला डब्बा उघडला आणि घाई घाईने सर्व पदार्थ फस्त केले. आता हे सगळ हा व्यक्ती आपल्या मुलांसाठीच करत असणार. बाप त्याची माया, प्रेम आणि कष्ट या सर्व गोष्टी या एका व्हिडीओतील प्रसंगावरून समजत आहेत. प्रत्येक वडील आपल्या मुलांसाठी दिवसरात्र मेहनत घेत असतात. मुलांचे बालपण, शिक्षण आणि लग्न इथपर्यंत काम करतात आणि मुलांना सर्व गोष्टी पुरवतात.
मात्र बऱ्याच ठिकाणी मुलं आपल्या वडिलांचा अनादर करतात. तुम्ही आमच्यासाठी आतापर्यंत काय केलं? असे प्रश्न विचारतात. एव्हढी मेहनत घेणाऱ्या बापाला त्यांची मुलं मोठे झाल्यावर असे प्रश्न विचारत असतील तर त्यांच्या मनाला होणाऱ्या वेदना फार मोठ्या असतात.
सोशल मीडियावर @shreee_shiiv या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत सादर व्हिडिओला लाखोंच्या घरात लाइक्स मिळालेत. यावर अनेक वडिलांनी आणि मुलांनी छान कमेंट करत मनातल्या भावना व्यक्त केल्यात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.