
Bengaluru Viral Video: जगभरात अनेक नागरिकांचे रस्ते अपघातात मृत्यू होत असतात.मात्र याच मृत्यूचे कारण वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे हे असते,असे असताना काही तरुणाई वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करताना दिसतात आणि स्वत:सह रस्त्यावरील नागरिकांचा जीव धोक्यात घालतात.सोशल मीडियावर अशा धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.सध्याही असाच एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
सोशल मीडिया म्हणजे प्रकाशझोतात येण्याचे एक वेगवान माध्यम आहे.गेल्या काही वर्षात प्रसिद्धीसाठी काही तरुण स्टंटबाजी करताना दिसून आले आहेत,त्यात काहींना आपला जीवही गमवावा लागलाय.मात्र तरीही धोकादायक पद्धतीने स्टंटबाजी करणं थाबेना.सध्यचा व्हायरल होत असलेला व्हिडिओही(Video) तरुणांच्या स्टंटबाजीचा आहे.ज्यात पुढे तरुणांसोबत जे घडतं ते पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दोन तरुण दिसत आहे.जे एका स्कुटीवर बसलेले आहेत.त्यातील एक तरुण धोकादायक पद्दतीने स्कुटी चालवत स्टंटबाजी करत आहे तर दुसरा तरुण त्याच्या पाठीमागे बसलेला आहे.सर्व धक्कादायक प्रकार रस्त्यावरील एक नागरिकाने मोबाईलमध्ये कैद करुन सोशल मीडियावर व्हायरल केलेला आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ बेंगळूरूमधील असल्याचे समजत असून काही दिवसांत पोलिसांनी या स्टंटबाजी(Stunt) करणाऱ्या तरुणांवर कारवाई केलेली आहे.सध्या हा व्हिडिओ एक्स प्लॅटफॉर्मवरील '@gharkekalesh' या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला असून नेटकऱ्यांनी संतापजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.
टीप: स्टंटबाजीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.