
Dance Viral Video: सोशल मीडियावर कायमच अनेक कार्यक्रमातील घटना व्हायरल होतात. मग कधी लग्नातील भावून प्रसंग असो वा एखादा गमतीदार घडलेला किस्सा. सध्या सोशल मीडियावर एका लग्नातील डान्स कार्यक्रमाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात चक्क नवरा-नवरीने डान्स केलेला आहे,परंतू एकदम जबरदस्त असा डान्स पाहून नेटकऱ्यांच्या पसंतीस व्हिडिओ आलेला आहे.
व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला लग्नाचा कार्यक्रम दिसून येत आहे. मात्र या कार्यक्रमात काही वेळात नवरा- बायको स्टेजवर जातात आणि डान्स करण्यास सुरुवात करतात. सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत दोघांनी अतिशय जबरदस्त डान्स केलेला आहे. यांनी 'तू सिर्फ मेरा महबूब मैं तेरी महबूबा'' हे गाणं डान्स(Dance) करण्यासाठी निवडलेले दिसत आहे.
नवरा-नवरीचा डान्स व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो व्हिडिओ ''chhaya_saxena004'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. सात दिवस व्हिडिओ पोस्ट झाले असून आतापर्यंत ११ हजारांपेक्षा अधिक लाईक्स व्हिडिओला मिळाले आहे तर लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळत आहेत.
सध्या नवरा-नवरीचा डान्स नेटकऱ्यांच्या मोठ्या पसंतील आलेला आहे. एवढेच नाही तर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रियाही केलेल्या आहे. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''मस्तच भाई'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' क्या बात है'' तर अजून एका यूजरने लिहिले आहे की,''नजर नको लागायला'', अशा कौतुकास्पद प्रतिक्रिया केलेल्या आहेत.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.