VIRAL VIDEO : नादच खुळा! मराठी गाण्यावर आजींनी धरला ठेका! व्हायरल VIDEO पाहून तुम्ही व्हाल थक्क

Dance Viral Video : सध्या सोशल मीडियावर अनेक डान्सचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात पुन्हा एकदा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.
Dance Viral Video
VIRAL VIDEO Saam Tv
Published On

कला ही लहान मुलांनपासून ते वयवृद्ध व्यक्तींमध्ये असते. प्रत्येक व्यक्ती हा आपली कला कुठेणा कुठे सादर करण्याचा प्रयत्न करत असतोच. कोणाला गायनाची आवड असते, तर कोणाला नाचण्याची आवड असते. आपल्याला आनंद साजरा करायचा असेल तर आपण तो कधी ही कुठे ही सादर करतो. लग्नाच्या वरातीत, मिरवणूकीत, कोणाच्या कार्याक्रमात भन्नाट डांन्स करणारे तुम्ही पाहिले असतीलंच. पण आपल्या नृत्याने उपस्थितांच्या मनावर भुरळ घालणाऱ्या या आज्जीचा डांन्स भन्नाट व्हायरल होतोय. या कोल्हापुरच्या आज्जीने "चंद्रा" या गाण्यावर डांन्स केलाय. आज्जीने तरुणींना लाजवेल अशा अदाकारी करुन डांन्स केलाय.

Dance Viral Video
Video Viral : गोणीत भरताना कोब्रा उलट फिरला अन् दंश केला; सर्प मित्राचा जागीच मृत्यू , VIDEO

व्हायरल होत असलेला व्हिडिओ,कोल्हापुरच्या(Kolhapur) गडहिंग्लज नगर परिषदेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातील आहे. या वेळी अनेक पुरुष मंडळी आणि अनेक महिला तेथे खुर्चीवर बसलेल्या दिसत आहेत,अशातच एक आज्जी येतात आणि डान्स करायला लागतात. आज्जीचा असा डान्स की अनेकजण डान्स करायला सुरुवात करतात.

आज्जीचा डान्स(Dance) करतांनाचा उत्साह पाहून अनेकांचेही पाय सुद्धा थिरकले. त्यांच्या डान्सनं तिथल्या वातावरण अधिक अल्हादयाक झालं. त्यांच्या ह्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावरही तुफान व्हायरल झाला आहे. चांगल्या वाईट प्रसंगात आपण अनेकवेळा धडपडतो मात्र आपला आनंद आपणच शोधायचा असतो. तसा या आज्जीने आपला आनंद शोधलाय.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म @journalist.ajay_25 या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेला आहे.व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक यूजर्संनी विविध प्रतिक्रिया दिलेल्या आहेत,त्यातील एक यूजरने लिहिले आहे की,'भारीच' तर अजून एका यूजरने लिहिले आहे की,'मस्तच'अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

Dance Viral Video
Viral Video : मुंबई लोकल ट्रेनमध्ये तरुणीचा थिल्लरपणा, भोजपुरी गाण्यावरील डान्स पाहून नेटकरी संतापले; VIDEO तुफान व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com