Cow Viral Video
Cow Viral VideoSaam Tv

Cow Viral Video: अरेच्चा ! हायवेला चक्क गाय चालवतेय सायकल; विश्वास बसत नाही? पाहा VIDEO

Cow Riding a Cycle Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक गाय चक्क सायकल चालवताना दिसत आहे.
Published on

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात अनेक व्हिडिओ प्राण्यांचेदेखील असतात.प्राणी हे खूप हुशार असतात, असं म्हणतात. पाळीव प्राण्यांना तर आपण जे शिकवू ते करतात. असाच एका गायीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक गाय चक्क सायकल चालवताना दिसत आहे. ही गाय रस्त्यावर बिनधास्त सायकल चालवत आहे.ही गाय अगदी एखाद्या सायकलस्वारासारखी सायकल चालवते. (Cow Viral Video)

Cow Viral Video
Viral Video : मुंबईत मद्यधुंद चालकाकडून लोकांच्या जीवाशी खेळ; व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांकडून कारवाई

व्हायरल व्हिडिओत एक गाय सायकल चालवताना दिसत आहे. ही गाय सायकलच्या सीटवर बसली आहे आणि सायकलचे पँडल मारताना दिसत आहे. गाय हायवेवर सायकल चालवताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

गावी प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात गाय असतेच. गायीला कोणतीही गोष्ट शिकवायला लागत नाही. अगदी तसंच या गायीलादेखील काही शिकवायला लागलं नाही. तिने तिच्या मालकाकडे बघून सायकल चालवायला शिकल्याचे सोशल मीडियावर म्हटले जात आहे. ही गाय अगदी उत्तम पद्धतीने सायकल चालवत आहे.

Cow Viral Video
Viral Video : गुलाबी साडीनंतर गुलाबी भजी झाली व्हायरल; नाही कांदा, नाही बटाटा, आता Rose भजी खा!

iam_road_king_5399 या सोशल मीडिया अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. गायीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ही खरंच गाय आहे की एडिटींग केली आहे, आता हेच पाहायचं राहिलं होतं. चक्क गाय सायकल चालवतेय, अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

Cow Viral Video
Viral Video : नादखुळा! पावसाला वैतागले, गावकऱ्यांनी भलामोठा बॅनरच लावला, मजकूर एकदा बघा तर खरं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com