Vegetables Wash In Dirty Water: तुम्ही खाताय ती चमचमीत भाजी गलिच्छ पाण्यात धुतलीये का?; दादर स्टेशनवरील महिलेचा संतापजनक VIDEO व्हायरल

Coriander Vegetables Wash In Dirty Water: हा व्हिडिओतील दृश्य पाहून नागरिक संताप व्यक्त करतायत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ मुंबईतील असल्याचा दावा करण्यात आलाय.
Vegetables Wash In Dirty Water
Vegetables Wash In Dirty WaterSaam TV
Published On: 

Dadar Railway Station: पालेभाज्या खाताना त्याला माती असल्याने त्या स्वच्छ धुवून घ्यावा लागतात. सध्या सोशल मीडियावर भाजी धुतानाचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडिओतील दृश्य पाहून नागरिक संताप व्यक्त करतायत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ मुंबईतील असल्याचा दावा करण्यात आलाय. (Latest Dadar Railway Station News)

रेल्वे स्टेशनवर गलिच्छ पाण्यात धुतली भाजी

व्हिडिओमध्ये एक महिला कोथिंबीरीच्या खुपसाऱ्या जुड्या घेऊन आलीये. यातील एक एक जुडी ही महिला रेल्वे प्लॅटफॉर्मवर धुवत आहे. मात्र यावेळी तिने चक्क गलिच्छ पाण्यात भाजी धुतलीये. एकएक करुन महिलेने कोथिंबीरीच्या सर्व जुड्या धुवून काढल्यात. तसेच ज्या कापडात तिने या सर्व जुड्या बांधून ठेवल्या होत्या ते कापड देखील गलिच्छ पाण्यात धुवून काढलंय.

Vegetables Wash In Dirty Water
Ahmednagar Crime News: खळबळजनक! अहमदनगरमध्ये घरात साठवून ठेवलेला मोठा शस्त्रसाठा जप्त

आमची मुंबई (Mumbai) या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करत लिहिलं आहे की, " दादर रेल्वे स्थानकावर (Dadar Railway Station) एक भाजी विक्रेती पाईपमधील गलिच्छ पाण्यात भाजी धुताना दिसत आहे. हे अत्यंत अस्वच्छ आणि गलिच्छ आहे.कृपया अशा भाज्या घेताना काळजी घ्यावी."

सदर घटना दादर स्टेशनमधील असल्याचं यात म्हटलं आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. अशात भाज्यांचे दर भरपूर वाढलेत. या भाज्या खरेदी केल्यावर जर त्या इतक्या गलिच्छ पाण्याने धुतल्या जात असतील तर, आरोग्यावर याचा मोठा परिणाम होतो.

Vegetables Wash In Dirty Water
Beed Crime News: शाळेतील शिपायाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या; बीडमधील काळजाचा थरकाप उडवणारी घटना

पित्त, पोटदुखी, मळमळ, उलट्या अशा अनेक व्याधी जडण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत असून नेटकरी यावर संताप व्यक्त करतायत. आतापर्यंत या व्हिडिओवर १५ हजारांहून अधिक लाइक्स आलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com