काँग्रेस-भाजप नेत्यांमध्ये राडा, Live शो मध्ये लाथा-बुक्क्यांनी मारहाण, व्हिडिओ पाहून डोक्यावर हात माराल

Congress vs BJP Fight on Live TV: तेलंगणातील जुबली हिल्स पोटनिवडणुकीवरील चर्चेदरम्यान लाईव्ह शोमध्ये काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार राडा झाला. एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला.
Fight Between BJP and Congress Leader on Debate
Fight Between BJP and Congress Leader on DebateSaam TV marathi
Published On
Summary
  • लाईव्ह शोमध्ये चर्चा सुरू असताना काँग्रेस व भाजप नेत्यांमध्ये वाद चिघळला.

  • वादाचे रूपांतर मारहाणीत झाले आणि दोन्ही नेत्यांनी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.

  • २१ सेकंदांचा हा मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला.

Fight Between BJP and Congress Leader on Debate : लाईव्ह टीव्ही शोमध्ये राजकीय चर्चा सुरू असताना दोन नेत्यांमध्ये आरडाओराड, आरोप प्रत्यारोप हे काही नवीन नाही. पण हीच चर्चा मारहाणीत रूपांतर झाली तर गंभीर विषय आहे. तेलंगणातील भाजप आणि काँग्रेस नेत्यांचा राडा सगळ्या देशाने पाहिला. लाईव्ह टीव्ही शोमध्ये काँग्रेस आणि भाजपचे नेते शाळकरी पोरांप्रमाणे वाद घालत होते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

तेलंगाणामधील हैदराबादच्या जुबली हिल्स विधानसभेची पोट निवडणुकीच्या निकालावर यो यो टीव्हीवप चर्चा सुरू होती. हा कार्यक्रम लाईव्ह होता. हजारो लोक नेत्यांमधील डिबेट पाहत होते. पण या चर्चेसत्रात काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यामध्ये जोरदार राडा झाला. एकमेंकाना लाथा-बुक्क्यांनी मारले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. निकालावर चर्चा सुरू असतानाच दोन्ही नेत्यांचा पारा चढला अन् गोष्ट मारहाणीपर्यंत पोहचली.

Fight Between BJP and Congress Leader on Debate
Pune : पुण्यात नगरसेवक पदासाठी तब्बल १ कोटीची बोली, धक्कादायक माहिती समोर

भाजप नेत्याने केली सुरूवात, मग...

लाईव्ह टीव्ही शो मध्ये काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती. त्याचे रूपांतर वादात झाल्याचे व्हिडिओत दिसतेय. भाजप नेत्याने आधी काँग्रेस नेत्याला ढकलले, त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये जोरात हाणामारी झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसतेय. हा वाद सूत्रसंचालकाने थांबवण्याचा प्रयत्न केला. पण दोन्ही नेत्याची हाणामारी सुरूच राहिली. या राड्यानंतर स्टुडिओमध्ये गोंधळ उडाला. अँकर शांत राहा शांता राहा ओरडत होता, पण यांचा राडा काही थांबत नव्हता. २१ सेकंदाचा व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क झाले आहे.

Fight Between BJP and Congress Leader on Debate
Pune : पुण्यात भाऊच झाला वैरी! भावाची निर्घृण हत्या केली, अन् मृतदेह पोत्यात भरून फेकून दिला

शाळकरी पोरासारखे नेते भांडत राहिले...

काँग्रेस आणि भाजप नेत्याच्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखाव व्हायरल झाला. त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया आल्या आहेत. हे शाळकरी पोरांसारखे भांडत आहेत, असे एका नेटकऱ्यांनी म्हटले. या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. अल्पवधीतच या व्हिडिओला शेकडो लोकांनी पाहिलेय. मोठ्या प्रमाणात व्हिडिओ शेअर केला जातोय आणि त्यावर असंख्य कमेंट्स होत आहेत.

Fight Between BJP and Congress Leader on Debate
Thane News : भाजपच्या नेत्याने शिंदेंच्या शिवसेना नेत्याच्या कानशिलात लगावली, ठाण्याचे राजकारण तापलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com