Delhi Viral Video: पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स घेऊन पळाला चालक, उड्डाणपुलावरील भरधाव कारचा VIDEO व्हायरल

Delhi Viral Video: बसमधील हाणामारी, दिल्ली मेट्रोतील कपल रोमान्स, प्रवाशांमध्ये धुमश्चक्री, तर कधी वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरून फरफटत नेल्याच्या घटना
Delhi Viral Video
Delhi Viral VideoSAAM DIGITAL
Published On

Delhi Viral Video

बसमधील हाणामारी, दिल्ली मेट्रोतील कपल रोमान्स, प्रवाशांमध्ये धुमश्चक्री, तर कधी वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरून फरफटत नेल्याच्या घटना दिल्लीत घडत असतात. त्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. आता दिल्लीतला आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे असं फक्त दिल्लीतच पाहू शकता! असं कॅप्शन त्यावर देण्यात आलं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Delhi Viral Video
Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रोत दे दणादण; दोन प्रवाशांमध्ये क्षुल्लक कारणावरुन भांडण, VIDEO व्हायरल

सोशल मीडिया असे माध्यम आहे की जगाच्या कानाकोपऱ्यात घडलेली घटना काही क्षणांत सगळीकडे आणि ती पण वाऱ्यासारखी पसरते. मग राजधानी दिल्ली असो वा मायानगरी मुंबई... राजधानी दिल्लीतील एक व्हिडिओ आता व्हायरल होतोय. व्हायरल होणं ठीक आहे, पण तितकाच चिंता वाढवणाराही वाटतो. कारण प्रश्न सुरक्षिततेशी संबंधित आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत काय?

दिल्लीत एका उड्डाणपुलावरचं रात्रीच्या अंधारातलं दृश्य. एक कार भरधाव जाताना दिसत आहे. आता फक्त कार असती तर, त्यात काय एवढं विशेष! पण त्या कारसोबत दिल्ली पोलिसांनी सुरक्षिततेसाठी लावलेले बॅरिकेडही आहे. हे बॅरिकेडसह कार वेगाने पळवली जात आहे. हे बॅरिकेड कारला कसं अडकलं असावं, असा प्रश्न हा व्हिडिओ बघून नक्की पडला असेल. कारसोबत बॅरिकेड असल्याचे समजल्यानंतर चालकाने कार थांबवून ते काढण्याचाही प्रयत्न केला नाही का?

व्हिडिओ 'लक्ष'वेधी

याच उड्डाणपुलावरून जाणाऱ्या एखाद्या वाहनातील व्यक्तीने हा व्हिडिओ शूट केला असावा, असे दिसते. @desimojito या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हायरल व्हिडिओला लाखोंच्या संख्येने व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. माझ्या दिल्लीला काय झालंय? असं चित्र फक्त दिल्लीतच बघायला मिळू शकतं, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून पोस्ट करण्यात आल्या आहेत.

Delhi Viral Video
Delhi Crime Viral Video: अल्पवयीन मोलकरणीवर केला अत्याचार, महिला पायलट आणि तिच्या पतीला जमावाने दिला चोप, व्हिडीओ व्हायरल...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com