सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री! पेट्रोल, डिझेलच्या भाववाढीने वाहतुकीच्या खर्चात वाढ

५ राज्यांच्या निवडणुकांनंतर पेट्रोल- डिझेलच्या किमतींमध्ये वाढ होणार असल्याचे सांगितले जात होते.
 petrol diesel prices
petrol diesel pricesSaam Tv
Published On

नवी दिल्ली: देशामध्ये महागाईने हैराण केले आहे. ५ राज्यांच्या निवडणुकांनंतर पेट्रोल- डिझेलच्या (Petrol-Diesel) किमतींमध्ये वाढ होणार असल्याचे सांगितले जात होते. या पार्श्वभूमीवर देशात पेट्रोल- डिझेलच्या भावामधील वाढीचे सत्र सुरु झाले आहे. देशामध्ये आज सलग सहाव्या दिवशी पेट्रोल- डिझेलच्या भावामध्ये वाढ झाली आहे. नव्या भावानुसार, डिझेल परत एकदा ५७ पैशांनी महागले आहे. तर पेट्रोलमध्ये (Petrol) प्रति लिटर ५२ पैशांची वाढ करण्यात आली आहे. ६ दिवसांतील पेट्रोल- डिझेलच्या भावातील ही पाचवी वाढ आहे. आज सकाळी ६ वाजल्यापासून देशभरात हे नवे दर लागू झाले आहेत.

हे देखील पहा-

नव्या भावानुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत (Mumbai) पेट्रोल ११३ रुपये ८८ पैशांवर पोहोचले आहे. हे देशात सर्वाधिक भाव आहेत. तर डिझेलचे भाव ९८ रुपये १३ पैशांवर पोहोचले आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलच्या भावामध्ये ८४ पैसे आणि डिझेलच्या (Diesel) भावामध्ये ८५ पैशांची वाढ झाली आहे. तर देशाच्या राजधानीचे शहर असलेल्या दिल्लीमध्ये १ लिटर पेट्रोलचे भाव ९९ रुपये ११ पैसे आणि १ लिटर डिझेल ९० रुपये ४२ पैसे वर पोहोचले आहे. काल राजधानीमध्ये ८० रुपयांची वाढ झाली होती.

राज्यात पेट्रोल- डिझेलच्या भावात वाढ झाली आहे. परभणीमध्ये देशात सर्वाधिक भाव आहेत. परभणीमध्ये पेट्रोल ११६.५६ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. तर डिझेल ९९.२६ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. तसेच, मुंबईमध्ये आज पेट्रोल ११३.८८ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. तर डिझेल ९८.१३ रुपये प्रति लिटरनं विकले जात आहे. जाणून घेऊया राज्यातील महत्त्वाच्या शहरांमधील भाव काय?

 petrol diesel prices
ट्रकसह चालकाचा जळून मृत्यू; नांदेडमधील धक्कादायक घटना

राज्यातील महत्त्वाच्या शहरांतील भाव काय?

शहरं पेट्रोलच्या किमती (प्रति लिटर) डिझेलच्या किमती (प्रति लिटर)

मुंबई (Mumbai) 113.88 98.13

पुणे (Pune) 112.87 96.41

नाशिक (Nashik) 114.12 96.91

परभणी (Parbhani) 116.56 99.26

सोलापूर (Solapur) 113.94 96.75

नागपूर (Nagpur) 113.75 96.59

देशातील महानगरांतील दर जाणून घ्या

शहरं पेट्रोलच्या किमती (प्रति लिटर) डिझेलच्या किमती (प्रति लिटर)

मुंबई 113.88 98.13

दिल्ली 99.11 90.42

चेन्नई 104.90 94.47

कोलकाता 108.53 95.00

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com