सोशल मीडियावर रोज काही ना काही अतरंगी गोष्टी व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतं. प्रेमात असलेली व्यक्ती आपल्या प्रेयसीला किंवा प्रियकराला भेटण्यासाठी काहीही करू शकते असं म्हटलं जातं. अशात आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी गेलेल्या एका तरुणाची चांगलीच फजीती झाली आहे. त्याच्या फजीतीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक उंच तीन मजली इमारत आहे. ही इमारत शाळेची किंवा महाविद्यालयाची असावी असं दिसतंय. या इमारतीच्या गच्चीवरून एक तरुण उड्या घेत खाली उतरत आहे. खिडक्यांचा आधार घेत तो खाली उडी मारताना दिसतोय. हा तरुण त्याच्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी तेथे गेला होता आणि नंतर त्याची चोरी पकडली गेल्याने तो खाली पळत सुटला.
तरुण त्याच्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी गच्चीवर गेला होता तेव्हा मुलीच्या वडिलांनी आणि काकांनी त्या दोघांना पाहिलं. काका आणि पप्पा येत असल्याचं दिसताच या तरुणाने तेथून धूम ठोकली आहे. @stunt_man_indori_ या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. तसेच यावर अनेक भन्नाट कमेंट देखील आल्या आहेत.
दिवसा भेटण्यासाठी गेल्याने असं झालं, असं एकाने कमेंटमध्ये म्हटलंय. तर आणखी एका नेटकऱ्याने चोराला रस्ता दाखवून दिला असं म्हटलं आहे. तर एका नेटकरी महिलेने या व्हिडिओवर म्हटलं आहे की, तरुणाची काही हाडे मोडली असती तर त्याला समजलं असतं. याला म्हणतात खतरों के खिलाडी, अशा अनेक भन्नाट कमेंटसह व्हिडिओला लाखोंच्या घरात लाईक्स मिळाले आहेत.
सदर व्हिडिओ हा बिहारमधील असावा असं म्हटलं जात आहे. कारण यावर भोजपूरी भाषेतील गाणं लावण्यात आलं आहे. प्रेयसीला भेटताना तिच्या कुटुंबीयांनी पकडल्यावर ते तरुणाला बेदम चोपतात. अशा प्रकारचे अनेक फनी व्हिडिओ देखील आजवर व्हायरल झालेले पाहायला मिळाले आहेत.
सध्या लग्न सराई सुरू आहे. त्यात काही दिवसांपूर्वी नवरा आणि नवरीचे लग्नातील काही फनी व्हिडिओ समोर आले होते. यामध्ये नवरीने नवऱ्याला पेढा भरवला आणि नवरदेवाने तोच पेढा नवरीला भरवण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट नवरीला पटली नाही आणि तिने लग्नमंडपातच हाणामारी सुरू केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.