Viral Video: बनाना राइड करताना भयंकर अपघात, पर्यटक उंच उडून समुद्रकिनाऱ्यावर पडले; थरारक VIDEO व्हायरल

Banana boat accident: इंडोनेशियातील सुलावेसीमध्ये बनाना बोट अपघातात पाच पर्यटक जखमी झाले. बोट किनाऱ्यावर आदळून हवेत पलटी झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पर्यटन सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Banana boat accident
Banana boat accidentSAAM TV
Published On

इंडोनेशियातील सुलावेसी ठिकाणी पंताई हरापन अम्मानी बीचवर एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. बनाना बोट राईड करत असताना बोट अचानक वाळूत आदळली हवेत पलटी झाल्याने पाच पर्यटक जखमी झालेत. या घटनेने पर्यटकांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

काय घडलंय नेमकं व्हिडीओमध्ये?

व्हायरल व्हिडिओमध्ये तु्म्ही पाहू शकता की, पर्यटकांनी भरलेली बनाना बोट वेगाने किनाऱ्याकडे येतेय. यावेळी ती वेगाने येत असताना अचानक वाळूत आदळतेय. जोरदार बोट घासली गेल्यामुळे ती बोट हवेत उडून पलटी होते आणि त्यावर बसलेले पाच जण बाहेर फेकले जातात.

Banana boat accident
Viral Video: देशातील एक असं रेल्वे स्टेशन जिथे वर्षातून फक्त दोनदा येते ट्रेन; काय आहे कारण, वाचा

यामध्ये बसलेल्या सर्वांनी लाईफ जॅकेट घातलेलं आहे. हवेतून खाली पडत असताना किनाऱ्याजवळ असलेल्या लहान मुलांवर ही लोकं आदळल्याचं पाहायला मिळतंय. हा व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात पाचही प्रवासी जखमी झालेत. त्यापैकी तीन महिलांना उपचारादरम्यान सलाईन लावण्यात आलं होतं. सर्व जखमींना लगेच जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं आणि त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

Banana boat accident
Viral Video: 20 वर्षीय तरूणीचा कारनामा; गर्दीचा फायदा घेत कांदिवली स्टेशनवर चोरलं २ लाखांचं मंगळसूत्र

मत्तिरोटासी गावाचे प्रमुख अमोर पातुरुसी यांनी या घटनेबद्दल प्रतिक्रिया देताना सांगितलंय की, ही घटना चुकून घडली असून आम्ही याची माहिती घेत आहोत. जखमींना आवश्यक ती वैद्यकीय मदत दिली जातेय. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पर्यटन विभागासोबत बोलून सुरक्षा उपाययोजना अधिक मजबूत करण्यात येतील.

या अपघातात जखमी झालेल्या एस्ती नावाच्या पर्यटकाने सांगितलं की, 'आम्ही पाच जण बनाना बोटवर होतो. त्यावेळी कोणत्याही मोठ्या लाटा नव्हत्या. चालकाला टर्न नीट घेत आला नाही. आम्ही किनाऱ्याजवळ खूप जवळ आलो होतो आणि अचानक बोट वाळूत आदळली.'

Banana boat accident
Vande Bharat food issue: वंदे भारत ट्रेनमधील जेवणात मिळालं झुरळ, IRCTC ची मोठी कारवाई, १० लाखांचा दंड

सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. काही युजर्सने यावेळी सुरक्षा मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केलं आहे. तर काहींनी अशा राईड्ससाठी कडक नियमांची गरज असल्याचं म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com