
बैलगाडा शर्यत ही खूप लोकप्रिय झाली आहे. गावोगावी प्रत्येक यात्रेत बैलगाडा शर्यत होते. शेतकरी आपली बैल जुंपतात आणि मोकाट सोडून देतात. काही सेकंदातच बैलगाडा जोरात धावत दुसऱ्या दिशेला जातो. हे दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारे असते.
आपण आतापर्यंत अनेक बैलगाडा शर्यती पाहिल्या आहेत. परंतु आंबेगावात चिमुकल्यांनी स्वतः लाच बैलगाड्याच्याजागी स्वतः ला जुंपलंय अन् शर्यत लावलीये. याचाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
चिमुकल्यांच्या बैलगाडा शर्यतीचा व्हिडिओ (Bailgada Video) समोर आला आहे. आंबेगाव तालुक्यातील चांडोली गावच्या यात्रेच्या बैलगाडा शर्यतीचा घाटात चिमुकल्यांची बारी सुटलीये!
बैलगाडा शर्यत हा फक्त नाद राहिला नाही तर शेतकऱ्यासाठी श्वास बनलाय. आता हा नाद चिमुकल्यांच्या ही अंगी उतरला आहे. चांडोली गावच्या यात्रेत गावक-यांनी चिमुकल्यांच्या शर्यतीला बैलगाडा घाटात स्थान दिलं अन चिमुकल्यांची बारी थेट बैलगाडा घाटात जुंपलीय.
एक जण बैलगाडीवर स्वार झाला अन् दोघांनी जुकाट धरलं सोबतीच्या मुला-मुलींनी भिर्रर्र..र्र" ची आरोळी दिलीय. बैलगाडा घाटातल्या कणखर नाऱ्यांनी शर्यतीचा घाट गाजला. हा अनुभव खूपच मस्त होता. जणू गावच्या मातीचा सूरच आकाशाला भिडला! चिमुकल्यांच्या या जिगरबाज खेळाच्या थराराने बैलगाडा घाटात धावणा-या चिमुकल्यांना कौतुकाची थाप दिलीये.
शेतकऱ्यांबरोबरच आता चिमुकली मुलेही बैलगाडा शर्यतीचा आनंद घेताना दिसत आहे. त्यांच्या मनात या शर्यतीविषयी खूप कुतूहल पाहायला मिळत आहे. जशी बैलांची शर्यत लागते. तशीच शर्यत या लहान मुलांनीही लावली. त्यांनी त्यांच्या कल्पनेनुसार स्वतः लाच बैलगाडीला जुंपलंय अन् जोरात धाव घेतली आहे. आजाबाजूला इतर मुले त्यांचा उत्साह वाढवत आहेत. त्यांना भिर्रर्र असं म्हणत प्रोत्साहन देत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.