Pune Crime: पुण्यात सैराट! बहिणीच्या प्रियकराला आई अन् भावाने संपवलं; भरचौकात फरशीने डोकंच फोडलं

Love Affair Turns Deadly in Pune Brother Arrested: बहिणीच्या बॉयफ्रेंडचा भाऊ आणि आईने मिळून काटा काढला आहे. डोक्यावर फरशीने वार करून त्याची हत्या केली आहे.
Pune
PuneSaam
Published On

पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. अशातच पुण्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बहिणीच्या बॉयफ्रेंडचा भाऊ आणि आईने मिळून काटा काढला आहे. डोक्यावर फरशीने वार करून त्याची हत्या केली आहे. या गंभीर मारहाणीत तरूण जागीच बेशुद्ध होऊन पडला. त्याला गंभीर अवस्थेत तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योच मालवली. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव चौकशी करत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं प्रकरण काय?

प्रदीप अडागळे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्याचे ऋषी काकडेच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. त्यामुळे ऋषी प्रदीपचा रागराग करत होता. दोघांमध्ये कायम टोकाची भांडणं होत. प्रदीप देखील ऋषीला शिवीगाळ देत असल्याची माहिती समोर आली आहे. याच रागातून ऋषी आणि त्याच्या आईने प्रदीपचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.

Pune
Crime: सख्खा भाऊ पक्का वैरी! संपत्तीच्या वादावरून लहान भावानेच मोठ्या भावाला संपवलं; धारदार शस्त्राने वार अन्..

मिळालेल्या माहितीनुसार, खुन्नस आणि राग यातून ऋषीने गुरूवारी रात्रीच्या सुमारास प्रदीपवर हल्ला चढवला. ऋषी आणि त्याची आई सविता तसेच मित्र शुभम मांढरे यांनी मिळून बहिणीच्या बॉयफ्रेंडला संपवलं. आधी मारहाण केली. नंतर फरशीच्या तुकड्याने डोक्यात वार करून हत्या केली. याचा व्हिडिओ देखील त्यांनी रेकॉर्ड केला. याच प्रदीप गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.

Pune
Ranjeet Kasle: 'मी पुण्यात येईल, मला अटक करा' रणजीत कासलेचा आणखी एक व्हिडिओ समोर

मात्र, उपचारापूर्वीच त्याचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तसेच काही तासांतच दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com