Alina Amir MMS Leak: ५ मिनिटांच्या त्या MMS चं सत्य आलं समोर; 'हा' मोठा ट्विस्ट पाहून व्हाल थक्क

5 Minute Viral Video: अलिना आमिरच्या नावाने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ५ मिनिटांच्या MMS व्हिडिओने मोठा वाद निर्माण केला होता. मात्र आता या प्रकरणामागचे सत्य समोर आले असून चाहत्यांना धक्का बसला आहे.
Alina Amir MMS Leak
Alina Amir MMS Leaksaam tv
Published On

आजकाल सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच सोशल मीडियावर जवळजवळ ५ मिनिटांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की, तो पाकिस्तानी सोशल मीडिया इन्फ्युएंसर अलिना आमिरचा खाजगी एमएमएस आहे. ही क्लिप लगेच अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पसरली.

व्हायरल झाल्यानंतर युझर्सने क्रॉस-चेक न करता ती शेअर करण्यास सुरुवात केली. दरम्यान अशातच अलिना आमिरने पुढे येऊन स्पष्ट केलंय की, हा व्हिडिओ तिचा नाही तर AI चा वापर करून तयार केलेला डीपफेक व्हिडीओ आहे.

Alina Amir MMS Leak
Viral Video: आईची नजर चुकली अन् चिमुकला थेट बाल्कनीच्या टोकावर बसला, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO व्हायरल

काय म्हणाली अलिना आमिर?

अलिना आमिरच्या म्हणण्यानुसार, हा संपूर्ण प्रकार जाणूनबुजून केला असून हा तिच्याविरूद्ध कट आहे. तिने म्हटलंय की, ही मस्करी किंवा थट्टा नसून एक गंभीर सायबर गुन्हा आहे. तिच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारचे डीपफेक व्हिडिओ महिलांना टार्गेट करण्यासाठी त्यांची इमेज खराब करण्यासाठी आणि मानसिक ताण देण्यासाठी तयार केले जातात.

हा व्हिडिओ इतक्या लवकर व्हायरल झाला की, तो अलिना आमिरच्या स्वतःच्या सोशल मीडिया पोस्टच्या कमेंट सेक्शनपर्यंत पोहोचला. लोकांनी तिथेही त्या क्लिपबाबत कमेंट केली. त्यानंतर अलिनाने या विषयावर आपलं मौन सोडलंय तिने म्हटलंय की, कोणत्याही गोष्टीचं सत्य जाणून न घेता लोक एखाद्याच्या आयुष्याबद्दल इतके गंभीर कंटेंट शेअर करतायत हे पाहून वाईट वाटतंय.

Alina Amir MMS Leak
Viral Video: शून्य मेहनत! आता मटार सोलायला अर्धा तास लागणार नाही, सोशल मिडीयावर व्हायरल झाला हॅक

सरकारकडे मागितली मदत

पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांच्याकडे अलीना आमिरने एआय-जनरेटेड कंटेंट तयार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मदत मागितलीये. तिने लोकांना लोकांना कोणताही व्हिडिओ फॉरवर्ड करण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळण्याचं आवाहन केलंय. अलीनाने म्हटलंय की, डीपफेकची टेकनिक केवळ सेलिब्रिटींपुरते मर्यादित नाहीत तर सामान्य लोकही त्याचे बळी ठरू शकतात.

Alina Amir MMS Leak
Viral Video: मेट्रो स्टेशनवर तरूणाचा किळसवाणा प्रकार, गेटजवळच केली लघवी, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com