तब्बल 3 हजार किलो भेसळयुक्त चहा पावडर आणि 1500 किलो मुदत संपलेली चहा पावडर जप्त करण्यात आलीय...ही पावडर तयार करण्यासाठी केमिकल, घातक रंग वापरला जातो...आणि कुणालाही शंका येणार नाही अशीच चहा पावडर बनवली जायची...आणि पैशांसाठी सर्रासपणे याची विक्री केली जायची...पण, अशा केमिकलयुक्त चहा पावडरमुळे किडनीवर थेट परिणाम होऊ शकतो असा दावा करण्यात आलाय...चहा अनेकजण आवडीने पितात...त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त पावडर कुठे जप्त केलीय...याची आम्ही पडताळणी केली आणि याचे शरीरावर काय गंभीर परिणाम होऊ शकतात हे आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेतलं...
हैदराबादमध्ये 3 हजार किलो भेसळयुक्त चहा पावडर जप्त
केमिकल, घातक रंग वापरून चहा पावडर बनवली जायची
भेसळयुक्त चहा पावडरमुळे लिव्हर, किडनीवर परिणाम होऊ शकतो
कॅन्सर, हार्मोनल असंतुलन आणि मेंदूच्या समस्या उद्भवू शकतात
भेसळयुक्त चहा पावडरमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात...त्यामुळे चहामधील भेसळ कशी ओळखायची हेदेखील पाहुयात...
भेसळयुक्त चहा पावडर कशी ओळखावी?
एका ग्लासात पाणी घेऊन त्यात एक चमचा चहा पावडर टाका
चहा शुद्ध असेल तर पाण्याचा रंग बदलणार नाही
भेसळ असल्यास पाणी लाल किंवा वेगळ्या रंगाचे होऊ शकते
सगळ्याच चहा पावडर या भेसळयुक्त नसतात...काही ठिकाणी पैशांसाठी भामटे चहा पावडरमध्ये भेसळ करून विक्री करतात...भेसळयुक्त पावडरमुळे किडनी, लिव्हरवर परिणाम होऊ शकतो हे खरं आहे...मात्र, चहा पावडरमुळे किडनी फेल होऊ शकते हा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.