Fact Check: आधार कार्डवर मिळणार 3 लाखांचं कर्ज? कर्ज घेण्यासाठी केंद्र सरकारची नवी योजना?

Aadhaar Card ₹3 Lakh Loan Message Goes Viral; आम्ही व्हायरल होत असलेल्या मेसेजची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो...आता आधार कार्डवर 3 लाखांचं कर्ज मिळणार असल्याचा दावा करण्यात आलाय...केंद्र सरकारची अशी योजना असल्याचा दावा केल्याने चर्चांना उधाण आलंय...पण, खरंच अशी योजना आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात..
AADHAAR CARD ₹3 LAKH LOAN FACT CHECK
AADHAAR CARD ₹3 LAKH LOAN FACT CHECKsaam tv
Published On

आता आधार कार्डवर तुम्हाला 3 लाखांचं कर्ज मिळू शकतं...होय, असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय...आधार कार्ड दाखवलं की 3 लाखांचं कर्ज देणारी योजना केंद्र सरकारची असल्याचा दावा करण्यात आलाय...पण, खरंच या दाव्यात तथ्य आहे का...? या मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

आधार कार्ड दाखवून 3 लाखांचे कर्ज देणारी केंद्र सरकारची योजना आहे. आधार कार्डवर कर्ज मिळणार आहे. केंद्र सरकार 'प्रधानमंत्री लोन योजने'अंतर्गत प्रत्येक नागरिकाला आधार कार्डवर 3 लाख रुपयांचे कर्ज देत असल्याचा दावा केलाय... सोशल मीडियावर सध्या हा मेसेज व्हायरल होतोय...पण, खरंच केंद्र सरकारची अशी योजना आहे का...? आधार कार्डवर कर्ज मिळवण्यासाठी काय करावं लागतं...? सध्या सगळ्यांकडेच आधार कार्ड उपलब्ध आहे...त्यामुळे असे अनेक जण प्रश्न विचारतायत...आम्ही याचं सत्य जाणून घेण्यासाठी पडताळणी सुरू केली...याबाबत अधिक माहिती सरकारकडून मिळू शकते...आमच्या टीमने याबाबत अधिकृत माहिती सरकारकडून मिळवली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

केंद्र सरकारची अशी कोणतीही योजना नाही

आधार कार्डवर 3 लाखांचं कर्ज मिळत नाही

कर्ज घेण्यासाठी आधार कार्ड हा पुरावा लागतो

नुसत्या आधार कार्डवर कर्ज मिळत नाही

आधार कार्डवर 3 लाख रुपये देण्याचे आश्वासन देणारा मेसेज फसवणूक करणारे आहेत. त्यामुळे असा मेसेज तुमच्याकडे आल्यास सावधगिरी बाळगा...तुम्हाला अशी कोणतीही लिंक फॉर्म भरण्यासाठी आली असेल तर क्लिक करू नका...तुम्हाला कर्ज देण्याच्या नादात तुमचेच पैसे खात्यातून गायब होऊ शकतात...त्यामुळे आमच्या पडताळणीत आधार कार्डवर सरकार 3 लाखांचं कर्ज देणार असल्याचा दावा असत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com