Viral Video: संतापजनक! मद्यधुंद अवस्थेत गुरुजी शाळेत पोहोचले; वर्गातच प्यायला बसले; VIDEO

Chhattisgarh Viral Video: व्हिडिओमधील शिक्षक चक्क दारुच्या नशेत शाळेमध्ये पोहोचले. धक्कादायक म्हणजे त्यांनी शाळेत आल्यानंतरही विद्यार्थ्यांसमोर बसून दारु पिली.
Chhattisgarh Viral Video
Chhattisgarh Viral VideoSaamtv
Published On

Drunk Teacher Viral Video:

उद्याचा सुशिक्षित समाज घडवण्याचे, अज्ञान दुर करुन ज्ञानाची कवाडे खुली करण्याचे महत्वाचे काम शिक्षक करतात. मात्र विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण, संस्कार देऊन घडवणारे शिक्षकचं जर चुकीच्या मार्गाला लागले तर काय होईल? असाच एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक शिक्षक चक्क शाळेतच दारु पित असल्याचे दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला संतापजनक व्हिडिओ हा छत्तीसगमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमधील शिक्षक चक्क दारुच्या नशेत शाळेमध्ये पोहोचले. धक्कादायक म्हणजे त्यांनी शाळेत आल्यानंतरही विद्यार्थ्यांसमोर बसून दारु पिली. संतोष कुमार केनवट असे शाळेत तैनात असलेल्या मद्यधुंद शिक्षकाचे नाव आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या शिक्षकावर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी जिल्हा शिक्षणाधिकारी (डीईओ) टीआर साहू यांनी मद्यधुंद शिक्षकाला निलंबित केले आहे. तसेच, डीईओने बीईओला शिक्षकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Chhattisgarh Viral Video
Sanjay Raut: महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले, "वंचित बहुजन आघाडीशिवाय..."

व्हिडिओमध्ये पाहू शकता की, शिक्षक दारूच्या नशेत शाळेत पोहोचले. यावेळी त्यांच्या शर्टच्या खिशात दारूची बाटली होती. हे पाहून एका तरुणाने शिक्षकाचा व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. या तरुणाने सहाय्यक शिक्षक संतोषकुमार केनवट यांना खिशात काय आहे, अशी विचारणा केली असता, तुझे जे काही काम आहे, ते मला सांग, असे सांगितले.

दारूबाबत विचारले असता शिक्षक म्हणाला की 'आम्ही काहीही करू शकतो. मुख्याध्यापकांना जाऊन सांग. मी रोज पितो, काही हरकत नाही," त्यानंतर तो मद्यधुंद अवस्थेत शिक्षक कक्षात पोहोचला आणि मुख्याध्यापकांसमोरच दारू पिण्यास सुरुवात केली. या धक्कादायक घटनेवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)

Chhattisgarh Viral Video
Nagpur Metro: नागपूरकरांसाठी खूशखबर! मेट्रो तिकीटदरात कपात, नवे दर आजपासून लागू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com