Destination Wedding Video: हाडे गोठावणारी थंडी, बर्फाचा वर्षाव, अन् लग्न! हटके विवाह सोहळ्याचा व्हिडिओ पाहाच!

Destination Wedding Himachal Pradesh Viral Video: विशेष म्हणजे लाँगेस्ट रोड ट्रिप वेडिंग एक्स्पिडिशनचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर नोंदवण्यात आला असून या जोडप्याला प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
Destination Wedding Himachal Pradesh Viral Video:
Destination Wedding Himachal Pradesh Viral Video:Saamtv
Published On

Himachal Pradesh Wedding Viral Video :

सोशल मीडिया म्हणजे असंख्य व्हिडिओंचा खजिना. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एकापेक्षा एक भन्नाट अन् तितकेच चक्रावून टाकणारे व्हिडिओ पाहायला मिळतात. अशाच एका हटके विवाह सोहळ्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होण्याचे कारण म्हणजे गुजरातमधील एका जोडप्याने चक्क  हिमाचल प्रदेशातील स्पिती व्हॅलीतील बर्फाच्छादित पर्वतात लग्नगाठ बांधली.

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सुंदर, अविस्मरणीय क्षण असतो. प्रत्येकजण आपले लग्न कायम आठवणीत राहण्यासाठी अनेक हटके प्रकार असतात. लग्नासाठी हटके डेस्टिनेशन, आलिशान हॉल शोधत असतात. मात्र हाडे गोठावणाऱ्या थंडीत विवाह करण्याचे धाडस क्वचितचं कोणी केले असेल. मात्र गुजरातमधील एका जोडप्याने असेच हटके ठिकाण शोधत लग्नगाठ बांधली.

मिळालेल्या माहितीनुसार, हिमाचलच्या स्पितीमधील उदयपूर विभागातील मूरंग गावात या लग्नाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दरीत चारही बाजूने बर्फाची पांढरी चादर पसरली होती आणि येथे मंडप सजला होता. विशेष म्हणजे लाँगेस्ट रोड ट्रिप वेडिंग एक्स्पिडिशनचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर नोंदवण्यात आला असून या जोडप्याला प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

Destination Wedding Himachal Pradesh Viral Video:
Buldhana News : गुरांसह शेतकरी कुटुंबीयांचे तहसिलमध्ये ठिय्या आंदोलन; अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईची प्रतीक्षा

वधू गुजरातची आहे, पण आता ती मुंबईत राहते. तर, वर रणजित श्रीनिवास केरळचा रहिवासी आहे. तो दुबईत व्यवसाय करतो. वधू आर्या बुराने सांगितले की ती 2021 आणि 2023 मध्ये तिच्या शेरनी नावाच्या थारमध्ये एकल प्रवासी म्हणून स्पितीला आली होती. तिला या ठिकाणचे सौंदर्य खूप आवडले. दोघेही 13 वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. त्याचवेळी त्यांनी स्पितीत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. या हटके विवाह सोहळ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Destination Wedding Himachal Pradesh Viral Video:
Shirpur News : ट्रॅक्टर सोडविण्यासाठी लाच मागितल्याचा संशय; वाहनचालक, पंटरविरुद्ध गुन्हा दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com