Viral News : देवा माझी सासू मरू दे...कलियुगी सूनेचं विचित्र साकडं, मंदिराच्या दानपेटीत टाकली चिठ्ठी

Belgaon Temple Note Viral News : बेळगावच्या रायबागमधील हुली कांतेश्वर मंदिराच्या दानपेटीत सापडलेल्या सुनेच्या सासूच्या मृत्यूची प्रार्थना असलेल्या चिठ्ठीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. या विचित्र घटनेमुळे यात्रेकरूही थक्क झाले आहेत.
Viral News : देवा माझी सासू मरू दे...कलियुगी सूनेचं विचित्र साकडं, मंदिराच्या दानपेटीत टाकली चिठ्ठी
Belgaon Temple Note Viral NewsSaam Tv
Published On
Summary
  • मंदिराच्या दानपेटीत सुनेची अजब प्रार्थना सापडली

  • सासूच्या मृत्यूची मागणी असलेली चिठ्ठी कन्नड भाषेत होती

  • कमिटी सदस्यांनी फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने घटना व्हायरल झाली

  • घटनेची परिसरात आणि सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू

Belagavi Raybag Huli Kanteshwar Temple Viral Prayer Note आपण देवाकडे मागताना बुद्धी, संपत्ती, यश, आरोग्य मागतो मात्र एका महिलेने चक्क स्वतःच्या सासूचा मृत्यू मागितला आहे. ही कोणत्याही मराठी मालिकेतील कथा नसून बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात घडलेली घटना आहे. एका मंदिरातील दानपेटीत सापडलेल्या चिठ्ठीची सर्वत्र चर्चा आहे. या चिठ्ठीत एका सुनेने 'देवा, पुढच्या यात्रेआधी माझी सासू मरु दे' असा लिहलेल्या मजकुराची चिठ्ठी दानपेटीत सापडली आहे.

खणदाळ तालुक्यातील रायबाग येथे हुली कांतेश्वर नावाचे मंदिर आहे. या मंदिरातील काही अधिकाऱ्यांनी दानपेटीतील रक्कम मोजण्यासाठी दानपेटी उघडली. यावेळी रक्कम मोजताना शंभर व दहा रूपये मूल्य असलेली नोट एकत्रित गुंडाळलेली होती. ती उघडली तेव्हा त्यामध्ये एक चिठ्ठी देखील आढळून आली.

Viral News : देवा माझी सासू मरू दे...कलियुगी सूनेचं विचित्र साकडं, मंदिराच्या दानपेटीत टाकली चिठ्ठी
Sambhajinagar Crime : गादीत गुंडाळलेल्या मृतदेहाचं गुढ उलगडलं, आईनेच काढला लेकीचा काटा; कारण ऐकून पायाखालची जमीन सरकेल

या चिठ्ठीमध्ये "देवा माझे कष्ट दूर कर, पुढच्या यात्रेच्या अगोदर माझी सासू मरू दे, असा मजकूर लिहिलेला आहे. हा मजकूर कन्नडमध्ये असून तो वाचल्यानंतर पैसे मोजण्यासाठी बसलेल्या यात्रा कमिटीच्या सदस्यांच्या चेहऱ्यावरही हसू फुटले. त्यामुळे कमिटीतील एकाने हा फोटो सोशल मिडियावर व्हायरल केला आहे. या चिठ्ठीची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com