राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून झिशान सिद्दीकी यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली असून पक्षाने याबाबत कुठलीही अधिकृत माहिती दिली नाहीये. राष्ट्रवादीला एकच जागा असल्याने अनेकजण इच्छुक होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे नेमके कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी दिली असून मुंबईमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. तर आणखी एक नाव चर्चेत असून ऐनवेळी कोणाला उमेदवारी मिळते याची उत्कंठा लागली आहे.
दरम्यान ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांनी उमेदवारी दिल्याने महाविकासआघाडीमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे जर उमेदवार असते तर आम्ही पाठिंबा द्यायला तयार होतो असे कॉँग्रेसने स्पष्ट केले आहे. तर भाजपकडून नवीन चेहऱ्यांना उमेदवारी दिली आहे. तर शिंदेगटाचा अद्याप सस्पेन्स कायम आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.