भाजपविरोधात आंदोलन महागात पडलं, झीनत यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात|VIDEO

Shabreen Zeenat Detained Outside BJP Vasant Smruti Office Mumbai: दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित AI समिट 2026 दरम्यान युवक काँग्रेसने घोषणाबाजी करत आंदोलन केले. मुंबईतील भाजप कार्यालयाबाहेर झालेल्या आंदोलनात शबरीन झीनात यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून राजकीय वातावरण तापले आहे.

दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित ‘AI समिट 2026’ दरम्यान शुक्रवारी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शर्ट काढून आंदोलन करत घोषणाबाजी केली. “PM is Compromised” अशा घोषणा देत मोठा गोंधळ घालण्यात आला. या प्रकरणी युवक काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष, सचिव आणि इतर पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

या घटनेनंतर राजकीय वातावरण तापले असून काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून एकमेकांविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, मुंबई येथे भाजपच्या वसंतस्मृति कार्यालयाबाहेर काँग्रेसकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. मुंबई युवक महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शबरीन झीनात यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, शबरीन झीनात यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com