Vijay Wadettiwar : वाल्मिक कराडचा एन्काऊंटर होणार? विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा | VIDEO

Walmik Karad CID Investigation : माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा सध्या पोलीस कोठडीत आहे. मात्र त्याचा एन्काऊंटर होऊ शकतो असा मोठा दावा विजय वडेट्टीवार यांनी आज केला आहे.

बीड माजी सरपंच संतोष देशमुख अपहरण, हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड बाबत कॉंग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी एक मोठा दावा केला आहे. मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काऊंटर होऊ शकतो असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. पोलीस दलातील अधिकाऱ्याचा हवाला देत त्यांनी हा मोठा दावा केला आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात 21 दिवसांपासून फरार असलेल्या आरोपी वाल्मिक कराड याने मंगळवारी पोलिसांना सरेंडर केलं. त्यानंतर त्याची चौकशी आता सुरू झाली आहे. सीआयडीकडून त्याची कसून चौकशी होत असतानाच आता कॉंग्रेसच्या वडेट्टीवार यांनी या सगळ्या प्रकारावर मोठा दावा केला आहे. बीडच्या मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काऊंटर होऊ शकतो असं त्यांनी म्हटलं आहे. पोलीस स्टेशनमध्ये बेड घेऊन गेलेत, यापूर्वीच असे कधी झाले नाही. हे कोणाचे लाड आहे? वाल्मिक कराडचे लाड पुरवेल जात आहे. यावर चौकशी झाली पाहीजे. मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आका कराडचा एन्काऊंटर होऊ शकतो. एका जवळच्या उच्चपदस्थ अधिकारीऱ्याने ही खात्रीलायक माहिती दिली आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हंटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com