महाराष्ट्रातील राजकारण, समाजकारणाचे सखोल अभ्यासक आणि ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांचे आज, बुधवारी निधन झाले. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी तीन दशकांहून अधिक काळ पत्रकारिता क्षेत्रात काम केले होते. अनेक आघाडीच्या वर्तमानपत्रांत त्यांनी महत्वाच्या पदांवर जबाबदारी सांभाळली होती. २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता दादर येथील शिवाजी पार्कमधील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या ग्रंथ निवड समितीच्या अध्यक्षपदाचीही जबाबदारी सांभाळली होती.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आसबे यांना श्रद्धांजली वाहिली. राजकारणाचा समाजजीवनावरील परिणामांचे विश्लेषक म्हणून ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रताप आसबे यांची पत्रकारिता सदैव स्मरणात राहील, अशा शब्दांत फडणवीसांनी श्रद्धांजली वाहिली. ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रताप आसबे यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा सखोल अभ्यास असलेला एक चांगला पत्रकार गमावला आहे, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.