डोनाल्ड ट्रम्प यांचा एक निर्णय अन् भारताच्या शेअर मार्केटमध्ये तुफान, सेन्सेक्स-निफ्टीचा ऐतिहासिक उसळी

Sensex today big jump : अमेरिकेने भारतीय वस्तूंवरील टॅरिफ १८ टक्क्यांपर्यंत कमी केल्यानंतर भारतीय शेअर बाजारात ऐतिहासिक तेजी पाहायला मिळाली. प्री-मार्केटमध्येच सेन्सेक्स ३ हजार अंकांनी वधारला तर निफ्टीने १४०० अंकांची झेप घेतली.

Impact of US tariff cut on Indian share market : भारतीय शेअर बाजारासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. अनेक दिवसानंतर भारताच्या शेअर मार्केटने मोठी उसळी घेतली आहे. अमेरिकेने भारतीय वस्तूंवरील टॅरिफ (आयात शुल्क) १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णायामुळे भारतीय शेअर बाजारात अक्षरशः 'तुफान' आले. प्री-मार्केट सत्रातच गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील यशस्वी चर्चेनंतर टॅरिफ कपात जाहीर करण्यात आली. याचा थेट परिणाम शेअर बाजारावर झाला. प्री-मार्केट सत्रात सेन्सेक्स तब्बल ३,००० अंकांनी वधारला, तर निफ्टीने १४०० अंकांची ऐतिहासिक झेप घेतली. जागतिक पटलावर भारतासाठी हा मोठा व्यापारिक विजय मानला जात आहे. भारतीय कंपन्यांच्या नफ्यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही काळापासून अमेरिकेने भारतीय उत्पादनांवर लादलेल्या कडक टॅरिफमुळे आयटी, फार्मा आणि कापड उद्योगावर दबाव होता. मात्र, आता हा टॅरिफ १८ टक्क्यांवर आल्याने भारतीय वस्तू अमेरिकन मार्केटमध्ये स्वस्त होतील, असे निलेश खरे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com