Uddhav Thackeray : प्रभू रामाचं नाव घेण्याची यांची पात्रता नाही, ठाकरेंनी भाजपला पुन्हा डिवचलं|VIDEO

BJP foundation day: आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने आपल्या कम्युनिकेशन विंगची स्थापना केली. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधत भाजपवर जोरदार टीका केली.

भाजपच्या स्थापना दिवसावर टोला लगावत उद्धव ठाकरे म्हणाले, आज भाजपचा स्थापना दिवस आहे, पण तो तारखेप्रमाणे आहे की तिथीप्रमाणे, की आपल्या सोयीप्रमाणे आहे, हे समजत नाही. जर स्थापना दिवस रामनवमीला साजरा करत असाल, तर मग रामासारखं वागण्याचा प्रयत्न करा. शुभेच्छा सर्वांनाच देतो, पण आचरणही तसंच असावं.

वक्फ बोर्डाच्या विधेयकावर बोलताना ठाकरे म्हणाले, या विधेयकावर आम्ही न्यायालयात जाणार नाही. काँग्रेस व इतर पक्ष जात असतील तर त्यांना जाऊ द्या. आम्ही आमची भूमिका पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केली आहे.

निवडणूक जिंकण्यासाठी ‘लाडक्या बहिणींना’ जास्त पैसे देतात, कर्जमाफी जाहीर करतात. पण जेव्हा शेतकऱ्यांवर वेळ येते, तेव्हा मात्र दुर्लक्ष करतात. ‘प्राण जाये पर वचन न जाये’ असं म्हणतात, पण भाजपाला रामाचं नाव घेण्याचीही पात्रता नाही, अशी टीका त्यांनी केली.

दरम्यान, माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त विधानावर प्रतिक्रिया देताना ठाकरे म्हणाले, कोकाटेंवर फसवणुकीचा आरोप आहे. त्यांच्या संदर्भात जो न्यायालयाचा निकाल लागला तोही आश्चर्यकारक आहे, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे न्यायालयाच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com