ठाकरेंची एकही सभा नाही, तरी मिळवली एकहाती सत्ता; पंचायत समितीवर मशाल धगधगली|VIDEO

UBT ShivSena Victory In Khed Panchayat Samiti Without Rallies: खेड पंचायत समितीवर उबाठा शिवसेनेने १६ पैकी १२ जागांवर विजय मिळवत निर्विवाद सत्ता स्थापन केली. एकही सभा न होता मिळालेल्या या विजयाने पुणे जिल्ह्यात राजकीय चर्चांना वेग आला आहे.

पुणे जिल्ह्यातील खेड पंचायत समितीवर उबाठा शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. एकूण १६ पैकी तब्बल १२ जागांवर उबाठा शिवसेनेने विजय मिळवत सत्ता स्थापन केली आहे.

याच निवडणुकीत जिल्हा परिषदेलाही उबाठा शिवसेनेने ५ जागांवर यश मिळवलं आहे, त्यामुळे तालुक्याबरोबरच जिल्हास्तरावरही पक्षाची ताकद वाढली आहे. मात्र या विजयाच्या पार्श्वभूमीवर आमदार बाबाजी काळेंना संमिश्र यशाचा सामना करावा लागला आहे.

पक्षाने सत्ता मिळवली असली तरी त्यांच्या बहिणीचा निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यामुळे खेडच्या राजकारणात सध्या “गड आला, पण सिंह गेला” अशी परिस्थिती आमदार बाबाजी काळेंची झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विशेष म्हणजे राज्यातील सर्वच पक्षातील प्रमुख नेते सभा घेत असताना उद्धव ठाकरे आणि पक्षातील एकाही दिग्गज नेत्याने एकही सभा न घेतल्याचे दिसून आले. तरी देखील पुणे जिल्ह्यातील खेडमध्ये मशाल पेटली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com