विरारमधील धक्कादायक घटना! दुसऱ्या मजल्यावरील ग्रीलमधून पडला अडीच वर्षांचा मुलगा अन्...

Two And Half Year Old Boy Felt From Second Floor : विरार पूर्व येथील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली अडीच वर्षांच्या मुलगा खाली पडला. पहिल्या मजल्यावर असलेल्या पत्र्याच्या शेडवर पडल्यामुळे तो बचावला.
Two And Half Year Old Boy Felt From Second Floor
Two And Half Year Old Boy Felt From Second Floor
Published On

मनोज तांबे, साम प्रतिनिधी

विरार पूर्वेकडील एका निवासी इमारतीत बुधवारी रात्री थरारक घटना घडली. दुसऱ्या मजल्यावरील ग्रीलमधून अडीच वर्षांचा चिमुकला अचानक खाली कोसळला. मात्र, सुदैवाने तो थेट जमिनीवर न पडता पहिल्या मजल्यावरील पत्र्याच्या शेडवर पडल्याने त्याचा जीव थोडक्यात बचावला. ही घटना रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास घडली. मुलगा पडताच त्याच्या रडण्याचा आवाज परिसरातील नागरिकांच्या कानावर पडला. आवाजाच्या दिशेने धाव घेत स्थानिकांनी तात्काळ प्रसंगावधान राखत मुलापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. काही नागरिकांनी शिडी आणि अन्य साधनांच्या मदतीने शेडवर अडकलेल्या मुलाला सुखरूप खाली उतरविले.

घटनेनंतर परिसरात काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, मुलाची प्रकृती सुरक्षित असल्याचे समजल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या प्रसंगात स्थानिक नागरिकांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याची भावना व्यक्त होत आहे.

लहान मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घरातील ग्रील, खिडक्या आणि बाल्कनीमध्ये आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचे असल्याचेही या घटनेनिमित्त अधोरेखित झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे एका निष्पाप चिमुकल्याचे प्राण वाचल्याने परिसरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com