मातृदिनी आई हळहळली! तुळजापुरात 19 वर्षीय तरुणाची हत्या|VIDEO

Krishna Rasal Killed Case Full Details: तुळजापूरमध्ये 19 वर्षीय कृष्णा रसाळच्या निर्घृण हत्येनंतर मातृदिनी आईची भावनिक हाक दिली आहे. एक आरोपी अजूनही फरार असून कुटुंबीयांची न्यायासाठी आर्त मागणी केली आहे.

बालाजी सुरवसे, साम टीव्ही

तुळजापूर येथे आठवडाभरापूर्वी 19 वर्षीय कृष्णा रसाळ या तरुणाचा निर्घृण खून झाल्याची घटना घडली असून, या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मातृदिनाच्या पार्श्वभूमीवर कृष्णाच्या आईने हातात मुलाचा फोटो घेत न्यायासाठी हाक दिली आहे.

या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार असून, त्याला तातडीने अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी रसाळ कुटुंबीयांनी केली आहे. माझ्या मुलाला न्याय द्या, अशी भावनिक साद देत कुटुंबीयांनी मुख्यमंत्रीांकडेही गाऱ्हाणे मांडले आहे.

दरम्यान, तुळजापूर या तीर्थक्षेत्रात गेल्या सहा महिन्यांत खून, गोळीबार आणि हाणामारीच्या अनेक घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणीही स्थानिकांकडून होत आहे.

कृष्णाच्या आठवणींनी व्यथित झालेल्या आई-वडिलांनी आपल्या भावना व्यक्त करताना अश्रूंना वाट मोकळी करून दिली. या प्रकरणी पोलिसांनी जलद कारवाई करून सर्व आरोपींना अटक करावी, अशी अपेक्षा कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com