Video: "...तर तहसील कार्यालय जाळून टाकू!", आंबेडकरी संघटना आक्रमक!

लाडकी बहीण योजनेचा निधी अन् महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना याच्या निषेधार्थ धारूर तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय.

Beed News: मागासवर्गीय योजनेचा आमचा निधी वळविण्यापेक्षा, मुख्यमंत्र्यांनी आपला बंगला विकून लाडकी बहीण योजनेला पैसे द्यावेत. त्याचबरोबर अत्याचार करणारे सरकारच्या दलालीमुळे बाहेर फिरतात असं म्हणत बीडच्या धारूरमध्ये आंबेडकरी संघटना आक्रमक झालीय. लाडकी बहीण योजनेचा निधी अन् महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना याच्या निषेधार्थ धारूर तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय. दरम्यान आमच्या मागण्या येणाऱ्या तीन दिवसात पूर्ण केल्या नाही तर तहसील कार्यालयाला कुलूप ठोकू, तहसील कार्यालय जाळून टाकू, असा इशारा देखील यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com