Pune Porsche Car Accident News | अपघातातील पोर्शे कार पोलिसांनी केली पॅक

पुणे अपघात प्रकरणी जर्मनीतून येणार पोर्शे कार कंपनीचे अधिकारी?

Pune Porsche Accident Update | पुणे अपघात प्रकरणात मोठी अपडेट! अपघातातील पोर्शे कार पोलिसांनी पॅक केली आहे , पावसामुळे पुरावे नष्ट होण्याची भिती असल्यामुळे खबरदारी म्हणून पुणे पोलिसांनी हा उपाय शोधल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर गाडीच्या जर्मन प्रतिनिधींकडून देखील या गाडीची पाहणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांत RTO अधिकारी आणि पोलिस जर्मनीच्या पोर्शे गाडीच्या प्रतिनिधींसोबत पत्र व्यवहार करतील त्यानंतर जर्मनीचे प्रतिनिधी पुण्यात येऊन या गाडीचा तपास करतील, दरम्यान पोर्शे महागडी गाडी असल्यामुळे तिच्यावरील अपघाताचे कोणतेही पुरावे नष्ट होऊ नये म्हणून पुणे पोलिसांकडून ती पॅक करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com