Eknath Shinde News : एकीकडे गृहमंत्रिपदासाठी शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच असताना आता पालकमंत्रिपदासाठी देखील रस्सीखेच असल्याचे समोर आले. शिवसेना गृहमंत्रिपदासाठी आग्रही असताना ठाण्याच्या पालकमंत्रिपदासाठी देखील एकनाथ शिंदे आग्रही आहेत. तर दुसरीकडे भाजपदेखील ठाणे जिल्हा पालकमंत्रिपदासाठी आग्रही आहे. विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात भाजपचे जास्त आमदार विजय झाल्याने ठाण्याचे पालकमंत्रिपद भाजपच्याच मंत्राकडे राहावे असा देखील भाजपचा आग्रह आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपदासाठी शिंदे आग्रही आहेत, असे सूत्रांनी सांगितलेय.
शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज संध्याकाळी ७ वाजता रामटेक बंगल्यावर शिवसेनेचे मुंबईतील आजी-माजी खासदार, आमदार आणि नगरसेवक यांची बैठक होणार आहे. या बैठकीला मुंबईतील शिवसेना पदाधिकारीही उपस्थीत रहाणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुक पुढील दोन महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुक पूर्व तयारी आणि रणनिती संदर्भात ही बैठक होत असल्याची माहीती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.