VIDEO: 'लाडकी बहीण' नको, आम्हाला सुरक्षा हवी; संतप्त महिलांनी अंबादास दानवेंसमोर मांडली व्यथा

Ambadas Danve On Badalapur Case: बदलापूर स्थानकावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. बदलापूरमध्ये या आंदोलनाला हिंसक वळण आले. या आंदोलनाच्या ठिकाणी विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी भेट दिली.

बदलापूरमध्ये दोन शाळकरी मुलींवर अत्याचार करण्यात आल्याच्या घटनेनंतर आज आंदोलन करण्यात आले. बदलापूर स्थानकावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. बदलापूरमध्ये या आंदोलनाला हिंसक वळण आले. या आंदोलनाच्या ठिकाणी विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी भेट दिली. त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'साडेतीन वर्षांच्या मुलींवर अत्याचार झाल्यानंतर पोलिस ठाण्यामध्ये १२ ते १३ तास तक्रार घेतली जात नाही हे काय पॉलिटिकल मोटिवेटेड आहे का? ऐवढे आंदोलक आले हे काय पॉलिटिकल मोटिवेटेड आहे का? सरकारच्या विषयी त्याचा असलेला रोष आहे हा. पॉलिटिकल मोटिवेटेड नाही तर जनक्षोभ आहे हा आणि जनता व्यक्त करत आहे.'

तसंच, 'पोलिसांना लाठीमार करण्याची गरज नव्हती. जर १३ तास तुम्ही तक्रार करून घेत नाही तर जनता उत्स्फूर्तपणे आंदोलनात उतरत आहेत. त्यांच्यावर लाठीचार्ज कशाला करत आहेत. पोलिसांना लाठीचार्ज करण्याची गरज नव्हती. या प्रकरणाला काहीच राजकीय वळण दिले जात नाही.', असे मत देखील दानवे यांनी व्यक्त केले. यावेळी 'आम्हाला लाडकी बहीण योजना नको सुरक्षा पाहिजे.' अशी मागणी संतप्त महिलांनी अंबादास दानवे यांच्याकडे केली. तसंच 'आरोपीला फाशी झालीच पाहिजे.', अशी देखील मागणी सतंप्त महिला करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com