Marathi Bhasha Vijay Live Updates: वरळी डोममध्ये मराठी अस्मितेचा जल्लोष! ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला 'अमेरिकन पाहुणा' ठरतोय खास|VIDEO

Thackeray Brothers: ठाकरे बंधू तब्बल वीस वर्षांनंतर एकत्र आले असून, मुंबईच्या वरळी डोममध्ये भव्य विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अमेरिकेहून एक खास पाहुणा उपस्थित राहिला आहे.

त्रिभाषा धोरणाबाबतचा जीआर सरकारनं रद्द केल्यावर आज ठाकरेंची शिवसेना आणि मनसे विजयी मेळावा साजरा करणार आहे. मुंबईतील वरळी डोम इथं ठाकरेसेना आणि मनसेचा भव्य एकत्रित मेळावा होत आहे. विजयी मेळाव्याच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळतील. सकाळी 11.30 वाजता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे डोमला पोहोचतील. कुणीही आपल्या पक्षाचा झेंडा किंवा चिन्ह घेऊन येऊ नये, असं आवाहन करण्यात आलंय. तब्बल 2 दशकांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्यानं मोठी उत्सुकता आहे.

हाच कार्यक्रम बघण्यासाठी राज्यातून तर लोक येत आहे. परंतु एक पाहुणा हा सात समुद्र पार करून आला आहे. मराठे नावाचे हे व्यक्ति थेट अमेरिकेहून आले आहे. या संदर्भात त्यांच्या नेमके काय भावना आहे. पाहा व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com