अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीचे थेट Mumbai पोलिसांवर सवाल! Salman Khan गोळीबार प्रकरणावरुन थेट निशाणा

Tejasvee Ghosalkar Today News | भाईजानच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर मुंबई पोलिस अलर्ट मोडवर आले होते. यावेळी अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नीने मुंबई पोलिसावर नाराजी व्यक्त केली आहे. सलमानसाठी मुंबई पोलिस कामाला लागले. पण अभिषेकच्या हत्येकडे दुर्लक्ष का होतंय? असा थेट सवाल तेजस्वी घोसाळकर यांनी उपस्थित केलाय.

मुंबई : अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नीने मुंबई पोलिसावर नाराजी व्यक्त केली आहे. सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर मुंबई पोलिस अलर्ट मोडवर आले होते. सलमान खानच्या सुरक्षेत वाढही करण्यात आली. सलमानसाठी मुंबई पोलिस कामाला लागले. पण अभिषेकच्या हत्येकडे दुर्लक्ष का होतंय? असा थेट सवाल तेजस्वी घोसाळकर यांनी उपस्थित केलाय. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपली नाराजी व्यक्त केलीय. एका फेसबुक लाईव्ह दरम्यान अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या हत्याप्रकरणी सुरु असलेल्या पोलिस तपासावर तेजस्वी घोसाळकर यांनी प्रश्न उपस्थित केलेत. दरम्यान, तेजस्वी घोसाळकर यांनी साम टीव्हीचे आभार मानत आपली सविस्तर भूमिकाही स्पष्ट केली. त्यांनी दिलेली एक्स्क्लुझिव्ह प्रतिक्रिया देताना नेमकं काय म्हटलं, तेच आता या व्हिडीओतून जाणून घेणार आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com