Girish Mahajan : मंत्री गिरीश महाजनांच्या नावाने नाशिकमध्ये TDR घोटाळ्याचा आरोप, चौकशीचे आदेश

Girish Mahajan TDR scam allegations in Nashik : नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समिती बैठकीत टीडीआर घोटाळ्याप्रकरणी मंत्री गिरीश महाजन यांच्या नावाचा उल्लेख झाल्याने मोठा गदारोळ झाला.

Girish Mahajan latest news : नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समिती बैठकीत मंत्री गिरीश महाजन यांच्या नावावरून मोठा गदारोळ उडाला. शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका आणि स्थायी समिती सदस्य किरण गामने-दराडे यांनी बैठकीत थेट गंभीर आरोप केले. माजी नगरसेवक राकेश डोमसे हे मंत्री गिरीश महाजन यांच्या नावाचा गैरवापर करून मोठा टीडीआर (TDR) घोटाळा करत असल्याचा दावा त्यांनी केला.

या बैठकीत थेट मंत्र्यांचे नाव घेतल्यामुळे स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप कमालीचे आक्रमक झाले. "गिरीश महाजनांचे नाव न घेता, थेट संबंधित व्यक्तीचे नाव घेऊन बोला," असे सांगत सभापतींनी शब्द मागे घेण्याची मागणी केली. यावरून बैठकीत दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com