Nashik Conversion Case: नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद; TCS ने घेतली गंभीर दखल, VIDEO

TCS launches inquiry Nashik office Conversion case : 'कॉर्पोरेट जिहाद' प्रकरणाची टीसीएसने (TCS) गंभीर दखल घेतली आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी निवेदन प्रसिद्ध केलंय. टीसीएसच्या नाशिक शाखेतून समोर आलेल्या तक्रारी आणि आरोप अत्यंत चिंताजनक आणि क्लेशदायक असल्याचं ते म्हणाले.

टीसीएसच्या नाशिक शाखेतील तक्रारी, आरोप, धमक्या आदी प्रकरणांची अत्यंत गंभीर दखल कंपनीने घेतल्याचे टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी सांगितले. गेले काही दिवस या कंपनीत कर्मचाऱ्यांचा छळ, धर्मांतर झाल्याच्या तक्रारी येत होत्या. यासंदर्भात पोलीस तक्रारही करण्यात आली असून आरोपींना अटकही झाली आहे. याबाबत चंद्रशेखरन यांनी निवेदन प्रसिद्ध केले आहे.

हा प्रकार अत्यंत चिंताजनक आणि उद्वेगजनक आहे. याची अत्यंत गांभीर्यपूर्वक दखल घेण्यात आली आहे. आरोपी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून, तपासात पोलीस यंत्रणेला कंपनीकडून पूर्ण सहकार्य करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांनी कोणालाही दिलेल्या धमक्या, गैरप्रकार याबाबत टाटा ग्रुप 'झिरो टॉलरन्स' धोरण राबवत आहे. यासंदर्भात सत्य जाणून घेण्यासाठी सखोल चौकशी केली जाईल. टीसीएसच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आरती सुब्रमणियनही चौकशी करतील. तसेच या संदर्भातील कार्यपद्धतीत सुधारणा आणि आवश्यक उपायोजना यांची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जाईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com