अजित पवारांच्या पुतळा अनावरणाला तटकरे, पटेलांची अनुपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण

पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. मात्र, या सोहळ्याला सुनील तटकरे, प्रफुल पटेल, छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांची अनुपस्थिती दिसून आली.

Sunil Tatkare Praful Patel Absent : पुण्यातील जिल्हा परिषद प्रांगणात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते दिवंगत नेते अजित पवार यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला. मात्र, या महत्त्वपूर्ण सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) अनेक बड्या नेत्यांनी अनुपस्थित राहिल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

अजित पवार यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे , ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल, छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांसारखे प्रमुख नेते या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते.

एका बाजूला केंद्रीय मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह दिग्गज नेते सोहळ्याला उपस्थित होते. पण दुसऱ्या बाजूला पक्षातील सर्वोच्च नेत्यांनी पाठ फिरवल्याने चर्चेला उधाण आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.