"RSS रजिस्टर आहे का?" सुजात आंबेडकरांचा थेट सवाल|VIDEO

Sujat Ambedkar Sparks Debate: छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या जनआक्रोश मोर्चादरम्यान सुजात आंबेडकर यांनी आरएसएसवर थेट सवाल उपस्थित केला.

छत्रपती संभाजीनगर: येथे आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आरएसएस (RSS) च्या कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चाला पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेच्या कारणास्तव परवानगी नाकारलेली आहे. मात्र, मोर्चा काढणारच अशी भूमिका वंचितकडून घेण्यात आली होती. वंचितसोबत विविध आंबेडकरवादी संघटना आणि पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले आहे. या जनआक्रोश मोर्च्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी राज्य कार्यकारिणी सदस्य उपस्थित झाले आहे. तसेच औरंगाबाद शहरातील फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारा मानणारे वेगवेगळ्या पक्ष, संघटनेतील नेते, कार्यकर्ते सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.

या मोर्चा दरम्यान सुजात आंबेडकर यांनी प्रसारमध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, संभाजीनगरमध्ये एका कॉलेजमध्ये आरएसएस नोंदणी करून घेत होते त्यांच्याकडे कुठलीही परवानगी नव्हती. मनुवाद पसरायला नको म्हणून त्यांना नोंदणी करायला आम्ही नकार दिला होता. आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा बेंच काढायला लावला तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला. आरएसएस इतर सदस्यांची नोंदणी करत होतं त्यांचं रजिस्ट्रेशन सुरू होतं. पण आरएसएस स्वतः रजिस्टर आहे का? असा प्रश्न सुजात आंबेडकरांनी विचारला. जर रजिस्टर असेल तर कुठल्या ऍड खाली रजिस्टर आहेत त्यांनी सांगावं असे आव्हान ही त्यांनी RSS ला दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com