Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

South Star Trisha Krishnan May Join TVK: अभिनेत्री त्रिशा कष्णन राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता आहे. लवकरच ती थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षात प्रवेश करून पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री त्रिशा कृष्णन राजकारणात एन्ट्री घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री थलपती विजय यांनी तिरुचिरापल्ली पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या आमदारकीचा राजीनामा दिला. या जागेवर अभिनेत्री त्रिशा कृष्णन पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. थलपती विजय यांनी दोन जागांवर विजय मिळवला होता. त्यापैकी एक जागा रिक्त झाल्याने त्रिशा कृष्णन यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसंच, थलपती विजय आणि त्रिशा कृष्णनच्या चाहत्यांनी देखील तिने निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे. सध्या थलपती विजय आणि त्रिशा कृष्णन या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्यात. अशात त्रिशा कृष्णनचा लवकरच थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षात अधिकृतपणे प्रवेश होण्याची शक्यता आहे. थलपती विजय यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली त्या कार्यक्रमाला त्रिशाने देखील हजेरी लावली होती. त्यामुळे आता या चर्चांना जास्तच उधाण आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com