Monsoon 2025: सोलापूरमध्ये पावसाचा हाहाकार; जिल्ह्यातील या गावांना दिला सतर्कतेचा इशारा|VIDEO

Unseasonal Downpour in Solapur: राज्यात यंदा लवकर मान्सून दाखल झाल्याने महाराष्ट्रात सर्वत्र जोरात पाऊस सुरू आहे. सोलापूर जिल्ह्याला देखील पावसाने झोडपून काढले आहे.

सोलापूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे भोगावती नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कोरडी पडलेली ही नदी आता पहिल्यांदाच मे महिन्यात तुडुंब भरून वाहताना दिसत आहे.

मान्सूनपूर्व पावसामुळे नदीच्या पाण्यात झालेली वाढ ही संपूर्ण जिल्ह्यासाठी आशादायक असली तरी, नदीकाठच्या गावांसाठी ही स्थिती चिंतेची बनली आहे. विशेषतः वाळूज, मनगोली, तडवळे, ढोराळे, यावली, इर्लेवाडी, इरले, साकत या गावांतील नागरिकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.

गेल्या 40 वर्षांतील नोंदी पाहता, मे महिन्यात भोगावती नदी अशा प्रकारे दुथडी भरून वाहत असल्याचे हे दुर्मीळ दृश्य आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास नदीच्या पुराचा संभाव्य धोका लक्षात घेता स्थानिक प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com